पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : आकुर्डी चिखली रोडवरील थरमॅक्स चौकात अनेक दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे नागरिक, कामगार, उद्योजक, विद्यार्थी, कंपन्यातील अधिकारी मोठा संताप व्यक्त करत आहेत. pcmc
त्यात खाजगी ट्रॅव्हल्स गाड्यामुळे मोठी गर्दी होत आहे. संभाजीनगर येथील थरमॅक्स चौकातील टपऱ्या व अनधिकृत पार्किंग मोठ्या प्रमाणात आहेत. तेथे खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात थांबतात. शिवाय अनेकदा रॉंग साईडने वाहन चालक गाड्या घातल्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. ऑटो रिक्षावाले अनेकदा सिग्नल तोडून वाहतूक करताना दिसतात. pcmc
चौकातील अनेक इमारतींना स्वतःची पार्किंग सुविधा नसल्याने ग्राहक रस्त्यावरच गाड्या पार्क करतात. वास्तविक, याकडे पोलिस प्रशासन लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, याकडे त्यांच्याकडून सपशेल दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. pcmc
तसेच गरज नसताना चारचाकी घेऊन अनेक नागरिक रस्त्यावर वाहतुकीच्या कोंडीचे कारण ठरत आहेत, शासनाची, महापालिकेची अग्निशामक वाहने, रुग्णवाहिका, पीएमपीएल यांनाही या वाहतूक कोंडीमुळे तातडीने जलद सेवा देणे अवघड होऊ शकते, असा आरोप नागरिकांनी केला आहे. pcmc
परिसरातील इतर भागातही वाहतूक कोंडीतून मार्ग शोधणे वाहनचालकांसह नागरिकांना जिकरीचे झाले आहे. सततची वाहतूक कोंडी संभाजीनगर परिसरातील नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. निवडणुका येतात आणि जातात, पण वाहतूक कोंडीला जबाबदार कोण? वाहतूक कोंडी का सुटत नाही, निवडणुकांचे करायचे काय असा सवाल नागरिक, कामगार, विद्यार्थी यांचा आहे. pcmc
प्रतिक्रिया
आकुर्डी वरून चिखली गावात जाण्यासाठी चार किलोमीटर अंतर पार करण्यासाठी एक ते दीड तास लागतो, साने चौकापासून चिखली पर्यंतचा रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.
यासंबंधी अनेकदा महानगरपालिकेत प्रश्न उपस्थित केला परंतु त्याला दाद दिली जात नाही. प्रवासी, विद्यार्थी, उद्योजक आदींचे हाल होत आहेत. पोलिस व संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, त्यामुळेच वाहतूक कोंडी होत आहे.
–शिवानंद चौगुले (सामाजिक कार्यकर्ता)
हेही वाचा :
मोठी बातमी : वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या कारवर चप्पल फेक ?
मोठी बातमी : हज यात्रेत 550 जणांचा उष्मघाताने मृत्यू !
मोठी बातमी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचे वितरण
ब्रेकिंग : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध जागांसाठी मोठी भरती
वन विभाग अंतर्गत भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड
ब्रेकिंग : एक रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात, असा करा अर्ज !
धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ
ब्रेकिंग : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्याने धुतले, राजकारण तापले
NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती
धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ
मोठी बातमी : राहुल गांधी यांचा वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा