Saturday, May 18, 2024
HomeNewsPCMC:राज्यात कायदा आणि सुरक्षेचे तीन तेरा 'आप'चा आक्रोश मोर्चा

PCMC:राज्यात कायदा आणि सुरक्षेचे तीन तेरा ‘आप’चा आक्रोश मोर्चा

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.१२- राज्यात सातत्याने होत असलेल्या बेछूट गोळीबाराच्या घटना व बिघडलेली कायदा व सुव्यवस्था याविरुद्ध आज उद्योगनगरी पिंपरी चिंचवड येथे आम आदमी पार्टीच्या वतीने निगडी येथील तहसील कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

यावेळी निष्क्रिय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.हा मोर्चा आकुर्डी विठ्ठल मंदिर ते अप्पर तहसील कार्यालय निगडी येथे काढण्यात आला आपचे शहर उपाध्यक्ष संतोष इंगळे,सचिन पवार,वैजनाथ शिरसाठ,अशोक लांडगे,पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मीना जावळे,पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, पुणे जिल्हाध्यक्ष अमोल देवकाते यांनी तहसीलदारांना निवेदन दिले..


यावेळी आम आदमी पार्टी प्रदेश प्रवक्ते मुकुंद किर्दत,आप प्रदेश सचिव सागर पाटील,आप प्रदेश पदवीधर आघाडी अध्यक्ष चेतन बेंद्रे,शहर अध्यक्ष मिना जावळे,प्रवक्ते प्रकाश हगवणे,आदी पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनाम्याची मागणी केली.


यावेळी आपचे कमलेश रनवरे,स्मिता पवार,सरोज कदम,अजय सिंह,सुरेश भिसे,प्रशांत कोळवले,राहुल वाघमारे, ब्रह्मानंद जाधव,गोविंद माळी,अभिजीत सुर्यवंशी,सुरेंद्र कांबळे,कल्याणी चाकणे,स्वप्निल जेवळे,शुभम यादव,राज चाकणे,मिलिंद सरोदे,ॲड.गुणाजी मोरे,अमित मस्के,सय्यद अली,सुदर्शन जगदाळे,अक्षय शिंदे,सतीश यादव,किरण कांबळे,उमेश बागडे,अनिश वर्गीस,बालाजी कंठेकर,विक्रम गायकवाड,मयूर कांबळे,विजय लोखंडे,संजय कोने,शंकर थोरात,प्रशांत कांबळे,ॲड.अमित कांबळे,सुरेखा भोसले,नौशाद अंसारी,धनंजय बनकर,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय