Sunday, May 5, 2024
HomeNewsआळंदीत गणेश जयंती निमित्त देशमुख महाराज यांचे कीर्तन पर्वणी

आळंदीत गणेश जयंती निमित्त देशमुख महाराज यांचे कीर्तन पर्वणी

आळंदीत गणेश याग महाआरती चे आयोजन

आळंदी/अर्जुन मेदनकर:येथील लक्षशांती श्री गणेश मंदिरात श्री गणेश जयंती निमित्त राष्टीय युवा कीर्तनकार समाज प्रबोधनकार ह .भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या सुश्राव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे युवा उद्योजक सचिन येळवंडे यांनी सांगितले.

येथील शांताई पार्क वडगाव रस्त्यावरील लक्षशांती श्री गणेश मंदिरात श्री गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत.या मध्ये सकाळी पाच वाजता श्रीना अभिषेक,सकाळी सहा वाजता अथर्वशीर्ष पठण,सकाळी सात ते अकरा श्री गणेश याग,सकाळी अकरा ते बारा या दरम्यान श्रींची महाआरती,दुपारी बारा ते तीन या वेळेत महाप्रसाद वाटप होणार आहे.

या प्रसंगी मारुती महाराज कुरेकर,वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर,पिंपरी चिंचवड शहर भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप,भाजप शहर उपाध्यक्ष हरेश तापकीर,महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य संतोष कलाटे,शांताबाई येळवंडे,लक्ष्मण येळवंडे,युवा उद्योजक सचिन येळवंडे,सागर येळवंडे,संतोष येळवंडे आदी उपस्थित रहाणार आहेत.
कार्यक्रमाचे निमंत्रक समस्त शांताई पार्क रहिवासी मित्र परिवार,सुपर बझार परिवार,दत्तकृपा डेव्हलपर्स येळवंडे परिवार,आळंदी चऱ्होली खुर्द ग्रामस्थांचे वतीने करण्यात आले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय