Wednesday, November 13, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : निळ्या पूररेषेतील बांधकामांचे आठ दिवसात सर्वेक्षण; नद्यांलगतची बांधकामे...

PCMC : निळ्या पूररेषेतील बांधकामांचे आठ दिवसात सर्वेक्षण; नद्यांलगतची बांधकामे पाडणार

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पात्रालगत असलेल्या निळ्या पुररेषेतील बांधकामांचे येत्या आठ दिवसात क्षेत्रीय कार्यालय निहाय सर्वेक्षण करून बांधकामे निष्कासित करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या निष्कासनाच्या कारवाई दरम्यान आवश्यक असणारी सर्व सुरक्षा यंत्रणा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले. (PCMC)

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात नदीलगतच्या भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. त्याअनुषंगाने जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी पवना, मुळा, इंद्रायणी नदीपात्रात शहरातील निळ्या पुररेषेमध्ये असणारी बांधकामे निष्कासित करण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय चिंचवड येथे नियोजन बैठक पार पडली.

या बैठकीस पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम, महापालिका उप आयुक्त मनोज लोणकर, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त संदिप डोईफोडे तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. (PCMC)

शहरातून वाहणाऱ्या नद्यांच्या धरण क्षेत्रासह शहरी भागात होणारा पाऊस तसेच धरणांमधून होणाऱ्या विसर्गामुळे या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असते. त्यामुळे अनेकवेळा शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. त्यादृष्टीने कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी आवश्यक खबरदारीसह विविध उपाययोजना करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

पोलिस प्रशासन निष्कासन कारवाई दरम्यान पुरवणार सुरक्षा

पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांना आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर नदीपात्रातील निळ्या पुररेषेतील सर्व बांधकामे निष्कासित करण्याचे नियोजन बैठकीत निश्चित करण्यात आले. महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या निष्कासनाच्या कारवाई दरम्यान आवश्यक असणारी सर्व सुरक्षा यंत्रणा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : महाराष्ट्र बंदला न्यायालयाकडून ब्रेक, महाविकास आघाडी निषेध नोंदवणार

शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा, पवारांनी व्यक्त केली शंका

Accident : नेपाळ बस अपघात, ४० भारतीय प्रवाशांना जलसमाधी, १४ ठार

धक्कादायक : बदलापुरनंतर कोल्हापूरमध्ये दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून

MPSC : एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय; विद्यार्थ्यांच्या आंदोलनास यश

मोठी बातमी : दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार

सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन

श्री विलेपार्ले केळवणी मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धुळे अंतर्गत भरती

संबंधित लेख

लोकप्रिय