Wednesday, June 26, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : राज्यस्तरीय दौऱ्यातून जिल्ह्यातील कामगारांच्या समस्या समजतात- काशिनाथ नखाते

PCMC : राज्यस्तरीय दौऱ्यातून जिल्ह्यातील कामगारांच्या समस्या समजतात- काशिनाथ नखाते

विदर्भात असंघटित कामगार विभाग (NCP) व कष्टकरी संघर्ष महासंघाचा दौरा

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि.१६ – महाराष्ट्र राज्यातील कामगारांचे विभागवार अनेक प्रश्न आहेत मात्र त्यातही विविध जिल्ह्यांमध्ये विविध प्रकारच्या समस्या आहेत, कष्टकरी कामगारांना भेटूनच त्यांच्याशी समजून घेतल्यानंतर अनेक प्रश्नांची उकल होते जाण येते आणि लढाईसाठी एक वेगळी प्रेरणा मिळते असे मत राष्ट्रवादी या असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. Akola news

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार,नॅशनलिस्ट ट्रेड फेडरेशन, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे १५ व १६ जून रोजी वाशिम जिल्हा व अकोला जिल्हा येथे कष्टकरी कामगार संवाद दौरा आयोजित करण्यात आला. यावेळी कष्टकरी कामगारांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले.

त्यावेळी प्रदेश सचिव तुषार घाटूळे,वाशिम जिल्हा अध्यक्ष रवी जाधव, अकोला जिल्हा निमंत्रक विनोद गवई, अनिल गोरे,विशाल पाटील,विष्णू राठोड, गणेश धोटे,राजेश गवई अनिल जाधव आदीसह कामगार बांधव उपस्थित होते.

वाशीम आणि अकोला जिल्ह्यातील कामगारांना रोजगाराच्या संधीची कमतरता असल्याने पाहिजे तसे राबवून घेतले जात असून वाढती महागाई आणि सरकारी योजनांची अपुरी अंमलबजावणी यामुळे येथील कामगारांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.(The workers are facing many problems)

शासकीय नोंदणी अत्यंत कमी असून शासनाचे आणि संबंधित जिल्हा कामगार आयुक्त यांचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे. सदर जिल्ह्यामध्ये किमान व समान वेतनही मिळत नाही, त्यामुळे कामगारांचे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अंगमेहनतीचे काम करून घेऊन सुद्धा कामाचा मोबदला देण्यास वारंवार टाळाटाळ केली जात आहे. PCMC

ही व्यवस्था बदलण्यासाठी कामगार आयुक्तांची जबाबदारी महत्त्वाची आहे मात्र ते याकडे दुर्लक्ष करत आहेत तुम्ही दिलेली माहिती नक्कीच महत्वाची आहे म्हणून सर्व असंघटीत कामगाराकडून शासनाकडे पत्राद्वारे त्वरित मागणी करण्यात येणार आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कामगार सेल प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे यांचे उपस्थितीत मुंबईत लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

धक्कादायक : पुरलेल्या बाळाचा मृतदेह गायब, सोलापुरातील मोदी स्मशानभूमीतील घटना

ब्रेकिंग : EVM हॅक झाल्याच्या चर्चांवर निवडणूक आयोगाने दिली महत्वाची माहिती

ब्रेकिंग : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत 140 पदांसाठी भरती

ब्रेकिंग : 400 पार झालो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ

मोठी बातमी : EVM मशीन AI द्वारे हॅक होऊ शकते इलॉन मस्क यांच्या दाव्याने खळबळ

ब्रेकिंग : महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, भाजपची डोकेदुखी वाढली

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : भारतीय तटरक्षक दलात 320 पदांची मोठी भरती

NFL : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत 164 पदांची भरती

ब्रेकिंग : अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सरकार ऍक्शन मोड मध्ये

सिक्किममध्ये तिस्ता नदीचा कहर, अनेक भाग पाण्याखाली; 1500 पर्यटक अडकले!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय