पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : जगात कामोडीटी मार्केट हे गेली 1954 पासून हे अधिकृत मार्केट सक्रिय आहे. (PCMC)
मात्र नागरिकांना केवळ शेअर मार्केट माहिती आहे. सामान्य नागरिकांसाठी कामोडीटी मार्केट हे भविष्यात एक उत्तम व्यावसायिक पर्याय असेल. याचा देशाला महासत्ता होण्यासाठी फायदा तर होणारच शिवाय अप्रत्यक्षरित्या यातून देशाला एका उंचीवर घेऊन जाणारे क्षेत्र ठरेल आहे.
यासाठी सामान्यांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे.असे मत कमोडिटी अभ्यासक विराज जमदाडे यांनी निगडी येथे व्यक्त केले. (PCMC)
विराज एक्सलन्स कमोडीटी सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.
यमुना नगर निगडी येथे संपन्न झालेल्या कार्यशाळेत देशभरातून सुमारे नागरिक सहभागी झाले होते.
जमदाडे पुढे म्हणाले कि, कामोडीटी मार्केटबाबतीत नागरिकांमध्ये प्रचार व्हावा आणि जनजागृती हा कार्यशाळा घेण्याचा हेतू आहे.
तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आर्थिक सक्षम बनावे, यासाठी आम्ही नागरिकांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम घेत आहोत. असा हेतू त्यांनी नमूद केला.
या बाजारात नियमांचे पालन केल्यास किमान 50 हजार गुंतवणूक करून दिवसाला हजार ते दोन हजारापर्यंत नफा मिळवू शकता.
सोने, चांदी, क्रूड ऑइल, कॉपर, झिंक, नैसर्गिक वायू याची खरेदी विक्री करून नफा कमवू शकता. असे सांगत त्यांनी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर दिले.