पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: दि. 28- श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघाचा दहावा वर्धापन दिन दि.२८ जानेवारी 2024 रोजी ) मोठ्या उत्साहात पार पडला.याप्रसंगी स्वामी या अंकाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते करण्यात आले.सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा.हरिनारायण शेळके यांनी प्रास्ताविक करताना संघाचा दहा वर्षाचा आढावा घेतला.
माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी जेष्ठ नागरिक संघ घेत असलेल्या कार्यक्रमाची व उपक्रमाची प्रशंसा केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबमीस यांनी ” ज्येष्ठांचे सर्वांगीण आरोग्य ” या विषयावर अतिशय सखोल व मार्मिक असे प्रबोधन पर व्याख्यान दिले.उतारवयामध्ये सुखद आयुष्य जगायचे असेल तर,ज्येष्ठांची विचारसरणी कशा पद्धतीची असावी याविषयी मार्गदर्शन केले व नागरिक करत असलेल्या सर्व कार्याचा गौरव पूर्वक असा उल्लेख केला. संघाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात शंखनाद आणि स्वागत गीताने झाली.याप्रसंगी काही मान्यवरांचा उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मान देखील करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन सारिका रिकामे यांनी केले.आभार प्रदर्शन पर मनोगत राजाराम सावंत व अशोक सूर्यवंशी यांनी केले.सदर कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शोभा नलगे,नीता खरे,दिनकर पंडित ,यशवंत भोळे,कांचन नेवे,शिंदे सर,कैलास सराफ ,मनीषा देव आदींनी परिश्रम घेतले.उपस्थितांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली..