Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC:पुणे,पिंपरी चिंचवड सह महाराष्ट्रात कडाक्याची थंडी

PCMC:पुणे,पिंपरी चिंचवड सह महाराष्ट्रात कडाक्याची थंडी

पिंपरी चिंचवड:दि.२२-हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे,पिंपरी चिंचवड शहराच्या किमान तापमानात घट झाली आहे.पुणेकर गुलाबी थंडीचा अनुभव घेताना दिसत आहे. दिवसभर पुण्यात ऊन सावल्याचा खेळ सुरु राहणार   आहे. पहाटे पुणे आणि आसपासच्या चार भागात 9  ते 12अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

त्यामुळे पुणेकरांच्या दैनंदीन जीवनावर परिणाम झाला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे पुढील काही दिवस पुणे शहर आणि राज्याच्या इतर भागांमध्ये किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची घसरण होण्याची शक्यता आहे. तसेच कोकण आणि आसपासच्या प्रदेशात आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे.


उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. सोमवारी (ता. २२) मध्य प्रदेशातील दातीया यथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात किमान तापमान ३ ते ७ अंशांच्या दरम्यान आहे. उत्तर भारतात धुके, थंडीची लाट, थंड दिवस ही हवामान स्थिती कायम आहे.

२४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान

पुणे १२.१,पिंपरी चिंचवड ११.५, धुळे ६.३, जळगाव ९.०, कोल्हापूर १७.१, महाबळेश्वर १३.५, नाशिक ११.६, निफाड ८.८, सांगली १७.७, सातारा १४.५, सोलापूर १७.६, सांताक्रूझ १२.६, डहाणू १६.५, रत्नागिरी १७.८, छत्रपती संभाजीनगर ११.५, नांदेड १६.६, परभणी १४.८. अकोला १२.८, अमरावती १४.३, बुलडाणा १२.४, ब्रह्मपुरी १७.१, चंद्रपूर १६, गडचिरोली १४.२, गोंदिया १२.९, नागपूर १४.४, वर्धा १५.५, वाशीम १२.४, यवतमाळ १५

कमी दाबाचा पट्टा आणि पावसाची शक्यता

बांगलादेशावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे देशाच्या हवामानावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. बांगलादेशसह दक्षिण भारतात कर्नाटक ते पूर्व विदर्भापर्यंत कमी दाबाचं क्षेत्र पसरलं आहे. त्याचा परिणाम देशातील काही भागांमध्ये जाणवत आहे. पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तापमान दोन ते तीन अंशांनी घसरेल, अशीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय