पिंपरी चिंचवड /क्रांतीकुमार कडूलकर: रोटरी क्लब ऑफ निगडी,पुणे व ससून रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कान्हेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य तपासणी शिबिरात ३०० दिव्यांग नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.
यावेळी दंतरोग तपासणी, नेत्र तपासणी,
सामान्य आरोग्य तपासणी,रक्त तपासणी, त्वचा रोग तपासणी, हाडांची तपासणी करण्यात आली.सर्व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करीत दिव्यांग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष हरबिंदर सिंग, वैद्यकीय संचालक डॉ.अमोल मेहता, वैद्यकीय प्रकल्प प्रमुख राकेश सिंघानिया, कमलजित कौर, मुकुंद मुळे, अजित कोठारी, सुनील सुरी,डाॅ. शुभांगी कोठारी, रमेश राव,गीता खांडकर,रेणू मित्रा,प्रियंका जाधव, रा. कॉंग्रेसचे मावळ तालुक्याचे दिव्यांग सेलचे कार्याध्यक्ष वासुदेव लखिमले, ज्योती राजिवडे, तानाजी मराठे,सुभाष शेडगे,गणेश शेडगे,भरत राजिवडे, साजन येवले,जान्हवी बोत्रे, संदिप लांडगे,संदिप लोखरे, कु.प्रथमेश बनसोडे,नरहरी मालपोटे आदी मान्यवर उपस्थित होते .
सदर तपासणी शिबिरास मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी वासुदेव लखिमले यांनी आलेल्या सर्वाचे आभार मानले .