पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मावळ आणि पिंपरी- चिंचवड शहर परिसरामध्ये गेल्या ४८ तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यावर्षी पिंपरी चिंचवड शहरात संततधार पाऊस पडत आहे. (PCMC)
मावळ, खेड, हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणात संततधार पाऊस सुरू असल्याने पवना, इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नदीच्या दोन्ही बाजूने शेत जमीन पाण्याखाली गेली आहे. पवनेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. (PCMC)
सलग ४८ तास पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार,
पिंपरी- चिंचवड शहराच्या विविध भागांमध्ये काल दिवसभर तसेच रात्री आणि बुधवारी दिवसभर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. मागील पाच वर्षातील हा सर्वाधिक पाऊस १७६ मिमी नोंद झाला आहे, त्यामुळे शहरातील विविध भागांमध्ये झाडे पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे बुधवारी अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. (PCMC)
रुपीनगर तळवडे येथे B G कॅर्नर निगडी येथे झाडे पडून गाड्यांचे नुकसान झाले, तातडीने पिंपरी चिंचवड मनपा यंत्रणा तातडीने दाखल झाली, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. मनपा आपत्कालीन पथक, अग्निशमन दल,पोलीस आणि तेथील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित सहकार्य केले. (PCMC)
पिंपळे गुरव येथील सुदर्शन चौक, जिल्हा सामान्य रुग्णालय नवी सांगवी, चिंचवड येथील टाटा मोटर्स कंपनीसमोर, चिखली कुदळवाडी येथील मोरे पाटील चौक, थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटलसमोर, डांगे चौकालगत जुनी झाडे पडली. काही झाडांच्या फांद्याही पडल्या आहेत. निगडीतील पीएमपी बसथांब्यामागील एक झाड मुळासह कोसळले. त्याखाली सापडून दोन चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. (PCMC)
नवी सांगवी जिल्हा रुग्णालय, चिंचवड येथील टाटा मोटर्स समोर तसेच कुदळवाडी चिखली येथील मोरेवस्ती, चिंचवड गावातील बिर्ला हॉस्पिटल, थेरगाव डांगे चौक, पिंपरी वैभवनगर येथे झाड पडले. (PCMC)
पिंपरी चिंचवड मनपाची यंत्रणा अलर्ट असल्याने या प्रचंड पावसात दक्षता आणि जनसंपर्क याचे योग्य नियोजन दखल घेऊन शहरात सर्वत्र बारीक लक्ष ठेवून आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, आपत्कालीन पथके कार्यरत आहेत. (PCMC)
पवना, इंद्रायणीला महापूर
पवना नदीकाठच्या चिंचवड केशवनगर भागामध्ये नागरी वसाहतीमध्ये पाणी सोडले आहे.
मोई, कुरुळी, चिंबळी आदी नदी काठच्या गावांच्या स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या आहेत.
वाहतूक पोलीस विभाग वतीने इंद्रायणी नदीच्या पुलाच्या दोन्ही बाजूला बरिकेट लाऊन रस्ता बंद करून वाहतूक चिंबळी फाटा पुणे-नाशिक महामार्ग व निघोजे मार्गी तळवडे या बाजूने फिरवली असल्याची माहिती वाहतूक विभाग पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर चौरे यांनी दिली. (PCMC)
आतापर्यंत पडलेल्या पावसाची हवामान विभागाची नोंद खालीलप्रमाणे
लवासा : 453
लोणावळा: 370.5
निमगिरी: 232.5
चिंचवड: 175.0
तळेगाव दाभाडे : 167.5
लवळे: 166.5
वडगाव शेरी: 140.5
पाषाण: 117.2
शिवाजीनगर: 114.1
दापोडी: 102.0
खेड: 93.0
हवेली : 82.0
बारामती : 20.4
हेही वाचा :
रविकांत तुपकर यांनी केली नवीन पक्षाची स्थापना, विधानसभेच्या २५ जागा लढवणार
ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी
ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत
मोठी बातमी : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर, वाचा अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा !
ब्रेकिंग : अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड
दि. लातूर अर्बन को-ऑप. बँक लि. अंतर्गत भरती