Tuesday, May 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : निगडी येथे सामुदायिक अथर्वशीर्षाचे पठण

PCMC : निगडी येथे सामुदायिक अथर्वशीर्षाचे पठण

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : दि.२१-श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ, सेक्टर २७, निगडी प्राधिकरण येथे संस्कृती संवर्धन व विकास महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सामुदायिक श्रीगणेश अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला ! प्राधिकरण येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या सभामंडपात अनेक गणेश भक्तांच्या मुखातून उमटलेल्या अथर्वशीर्ष पठणाच्या या सामूहिक स्वरांनी वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते.


ओंकारनाद, शंखनाद व राष्ट्रकल्याणाच्या संकल्पनाने सामुदायिक अथर्वशीर्षाचे पठण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते. गणेशाची अथर्वशीर्षाची ११ आवर्तने करण्यात आले. यावेळी मंदिराचे अध्यक्ष दिलीप देशपांडे आणि विश्वस्त मंडळ, तसेच इतर कार्यकर्ते आणि संस्कृती संवर्धन विकास महासंघाचे रवीजी कळमकर, हभप किसन महाराज चौधरी, डॉ.अजित जगताप, भजन महासंघाच्या ज्योती कानेटकर, माधुरी ओक, प्राधिकरण विभाग प्रमुख चंद्रशेखर जोशी, शिवानंद चौगुले, विकास देशपांडे, ज्ञान प्रबोधिनी शाळेचे श्री. सुधीर कुलकर्णी व अन्य मान्यवर उपस्थित होते. निगडी येथील ज्ञानप्रबोधनीच्या १४ विद्यार्थ्यांनी, अथर्वशीर्ष पठणात सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. शेवटी प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय