पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे प्रणित भीमशक्ती संघटना, पिंपरी चिंचवड शहर कमिटीमध्ये रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते लक्ष्मण साळुंखे (पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष), एकनाथ कसबे (भोसरी विधानसभा अध्यक्ष), सुनील ससाने (भोसरी विधानसभा उपाध्यक्ष), चंद्रकांत टेंकाळे (निगडी से २२ शाखा अध्यक्ष), बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते सत्यवान सूर्यवंशी यांनी भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष सुरज गायकवाड, भीमशक्ती पश्चिम महाराष्ट्र युवा नेते विजय हिंगे यांच्या उपस्थितीत पुणे येथील शासकीय विश्रामगृह येथे भिम शक्ती संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी भीमशक्ती पुणे जिल्हा सरचिटणीस आदिनाथ कांबळे, अनिल अवसरमल (पुणे शहर सरचिटणीस), अजय जानराव (युवक अध्यक्ष पुणे शहर), सलीम शेख (पुणे शहर उपाध्यक्ष), अक्षय जाधव (पुणे शहर संघटक) आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सर्व प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी फोन द्वारे नवनियुक्त कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
शहराचे नाव बदलून जिजाऊ नगर करण्यासाठी लोकचळवळ उभारणार – महेश बारणे
अलंकापुरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा
रे नगर च्या लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नोव्हेंबर मध्ये हस्तांतरण – नरसय्या आडम मास्तर