Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पंढरपूर पालखी सोहळ्यास मोफत औषधे सेवा

PCMC : पंढरपूर पालखी सोहळ्यास मोफत औषधे सेवा

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर: दोन दिवसात पंढरपूर पायी पालखी सोहळ्याचे प्रस्थान होत आहे. या पालखी सोहळ्यास मोठ्या प्रमाणात वारकरी, भाविक पायी वारी करीत असतात, आषाढीवारीतील वारकरी, भाविकांचे आरोग्य योग्य राहावे यासाठी मधुकर बच्चे युवा मंच, चैतन्य ग्रुप व वूई टुगेदर फाउंडेशन (We together foundation) यांच्या पुढाकाराने लोक सहभागातून मोठ्या प्रमाणात औषधे दिली जातात. PCMC

या वर्षी सुद्धा या वारीतील वारकरी व भाविकासाठी मोठ्या प्रमाणात औषधे देण्यात आली. विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) वतीने गेली 30 वर्षे या दिंडी सोहळ्यात पूर्ण वेळ आरोग्य सेवा देत आहे. अनेक डॉक्टर्स, नर्सेस, स्वयंसेवक, कार्यकर्ते पूर्णवेळ आरोग्य सेवा देतात. PCMC

मधुकर बच्चे युवा मंच, चैतन्य ग्रुप, वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने गेली 15 वर्षे विश्व हिंदू परिषदेकडे सर्व औषधे सुपूर्द केली जातात. या वर्षी सुद्धा विश्व हिंदू परिषद पदाधिकारी यांच्याकडे मोठ्या प्रमाणात औषधे सुपूर्द करण्यात आली. चिंचवड मध्ये हा कार्यक्रम पार पडला.

महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे, यांच्या पुढाकाराने हा यशस्वी उपक्रम गेली 15 वर्षे सुरु आहे. या वर्षी वूई टुगेदर फौंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सभासद यांनी मोलाची मदत केली.

फौंडेशनच्या वतीने, अध्यक्ष सलीम सय्यद, खजिनदार दिलिप चक्रे, रवींद्र काळे, जयंत कुलकर्णी, श्रीनिवास जोशी, नीलकंठ कुलकर्णी, मंगला सपकाळे, आदी वूई टुगेदर फौंडेशनचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. pcmc news

मधुकर बच्चे युवा मंच व चैतन्य फार्मा ग्रुप वतीने पोपट बच्चे, गणेश बच्चे, अर्चना बच्चे, रोहिणी बच्चे, श्रुती तोरडमल, श्रावणी बच्चे, काजल गावडे – बच्चे, आकाश खिल्लारे, दत्ता औंदकर, सिंधू बच्चे, असावरी बच्चे, अक्षय गारगोटे, रंजना गारगोटे, आदिनी या उपक्रमात मोलाचे सहकार्य केले.

विश्व हिंदू परिषेदच्या वतीने डॉ. जगताप, गोविंद देशपांडे, यशवंत देशपांडे, पूजारी, पी.सां. वाठारकर, शेखर राऊत, जयंत खेडकर, आदी पदाधिकारी यांच्याकडे सर्व औषधे सुपूर्द केली.

पिंपरी चिंचवड केमिस्ट असो.माजी अध्यक्ष संतोष खिवंसरा, कुंदन एजन्सीचे अजय दर्डा, मोरया फार्मा ग्रुपचे मारुती हाके, पियूष गुप्ता, निलेश गाडगे, मनोज भिवरे, प्रिया भिवरे, निर्मित भिवरे, मैथिली भिवरे, अमोल पाटील, राजु म्हस्कर, उत्तम विटुळे,प्रशांत प्रधान , प्रभाकर भिवरे, लिलावती भिवरे, आदिनी या उपक्रमात सेवा म्हणून औषधे देऊन सहकार्य केले. जनसेवक:मधुकर बच्चे यांनी सूत्रसंचालन केले.

संस्कृती संवर्धनचे डॉ.अजित जगताप, गोविंद देशपांडे, सलीम सय्यद, मंगला सपकाळे, जयंत कुलकर्णी, श्रुती तोरडमल आदिनी या उपक्रमाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. चैतन्य ग्रुपच्या अर्चना बच्चे यांनी सर्वांचे आभार मानले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मिळणार अनेक अधिकार, मोदी सरकारची होणार अडचण !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

१ हजार ९१० आशा सेविकांचे मोबाईल सुविधेतून सक्षमीकरण

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

२ जुलैपर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करता येणार – जितेंद्र भोळे

मुख्यमंत्र्यांच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या भूमिपूजन दरम्यान मोठी दुर्घटना टळली

मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !

NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय