आता कशाला जाता दूर, आपले इथेच पंढरपूर (pcmc)
पिंपरी चिंचवड/ क्रांतीकुमार कडुलकर : आषाढी वारी म्हटले, की, देहू आळंदी, पंढरीची वारी डोळ्यासमोर येते. लाखो भाविकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी, पद्मनाभा एकादशी आणि मोठी एकादशी या नावाने ओळखले जाते. (pcmc)
या निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित), पेठ क्र. १६, राजे शिवाजीनगर चिखली प्राधिकरण येथील बालसंस्कार सेवा केंद्रातील मुलांनी आणि परिसरातील माता भगिनी यांनी भक्तिमय दिंडीचे आयोजन केले होते. (pcmc)
चिखली प्राधिकरण येथे आयोजित केलेल्या दिंडीमध्ये विठ्ठल रखुमाईची पालखी टाळ मृदुंगाच्या गजरात सेवा केंद्राच्या येथून विठ्ठल रखुमाई मंदिर येथे निघाली आणि येथील वातावरण भक्ती मय झाले. (pcmc)
“आता कशाला जाता दूर, अहो इथेच पंढरपूर!” असा अवर्णनीय बालगोपालांचा आणि वैष्णवांचा सोहोळा चिखली प्राधिकरण,पेठ क्रं 16, राजे शिवाजीनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. (pcmc)
या सोहळ्याचे नियोजन अलका गरुड, वैष्णवी बिरले, स्वाती मोहिते या सेवेकरी महिलांनी केले.
केंद्र संचालक महेश पोळ यांनी सर्व सेवेकरी, परिसरातील सर्व नागरिकांचे या भक्तिमय दिंडी सोहोळ्यात सामील झाल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
हेही वाचा :
अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना दुधाळ जनावरे गट वाटपाची योजना
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या जूनमधील सोडतीचा निकाल जाहीर
गर्भवती महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर राखेत सापडली धक्कादायक वस्तू, सर्वत्र खळबळ
मोठी बातमी : आता वारकऱ्यांना मिळणार पेन्शन, वारकरी महामंडळाची स्थापना