Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : देशाचे आदर्श नागरिक घडवण्याचे काम शिक्षकच करू शकतात - अण्णा...

PCMC : देशाचे आदर्श नागरिक घडवण्याचे काम शिक्षकच करू शकतात – अण्णा जोगदंड

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : ज्येष्ठ नागरिक संघ गणेशनगर वाकडच्या वतीने आदर्श शिक्षकांचे शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. (PCMC)

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. कारण ते एक उत्तम शिक्षक, राजकारणी, लेखक असे भारतरत्न होते.

या प्रसंगी प्रमुख पाहुणेअण्णा जोगदंड म्हणाले की, आई वडील जसे मुलावर संस्कार घडवतात, तसे विद्यार्थ्यांना देशाचा उत्तम आदर्श नागरिक घडवण्याचे काम हा शिक्षक करत असतात, शिक्षक दिन म्हणजे आपल्या गुरुजनाबद्दल आदर व कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचा दिवस आहे. (PCMC)

शिक्षक ज्ञानदानावरच विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतात. आई-वडीलांनंतर जर तुमच्यावर कोणाचे उपकार असतील ते तुम्हाला घडवणारे शिक्षकाचे असतात आणि त्यांचे ते उपकार आपण कधीच विसरणार नाहीत.आणि विसरू नयेत.

फक्त माझा विद्यार्थी खूप शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे यातच शिक्षक धन्यता मानतात म्हणून आयुष्यात तीन व्यक्तींना कधी विसरू नका ते म्हणजे ज्ञानाची शिदोरीत दिलेली गुरुजी आणि आई-वडील यांना न विसरण्याचा सल्ला जोगदंड यांनी यावेळी दिला.

वाकड जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष  विष्णुपंत तांदळे म्हणाले कि, दर महीन्याला जेष्ठ नागरीकांच्या वाढदिवसाबरोबरच त्यांची आरोग्य  विषयक व्याख्याने आयोजित करणे त्याची आरोग्य तपासणी केली जाते. सहलीचे आयोजन केले जाते. (PCMC)

भजन,भावगीते याचा ही आम्ही वर्षभर कार्यक्रम राबवित असतो आणि काही जेष्ठ नागरीक चित्रपटातील गाणे गाऊन आम्हा सर्वांचे मनोरंजन करतात त्यांच्या ही कलागुणांना वाव दिला जात़ो.

शिक्षण दिनाच्या कार्यक्रमला आमच्या भगिनींना यांनी श्रीमती कुमुदिनी घोडके यांनी गुरू महिमा, गुरूंचे महत्व सुश्राव्य प्रवचन तबलावादकाच्या तालावर केले . 

जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विष्णु तांदळे यांनी प्रास्ताविक केले. तर नागनाथ तोडकरी यांनी सूत्र संचलन केले.

यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विष्णु तांदळे, मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, जेष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ, गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे संचालक भरत शिंदे, कुमूदिनी घोडके, कृष्णा कळसकर, रमेश रासेकर, जयश्री श्रीखंडे, प्रमोद वाळणकर सह अनेक जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यास राजेंद्र परदेशी, नामदेव शेकोकर, तात्या तोरसे यांनी सहकार्य केले.

संबंधित लेख

लोकप्रिय