Wednesday, May 22, 2024
HomeNewsPCMC:मनपाची "गुड न्यूज"- नव्या वर्षात कोणतीही करवाढ नाही

PCMC:मनपाची “गुड न्यूज”- नव्या वर्षात कोणतीही करवाढ नाही

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाकरिता करांचे व करेत्तर बाबींचे दर निश्चित करणे तसेच मालमत्ता सर्वेक्षणात नवीन आकारणी होणाऱ्या मालमत्तांचे प्रथम बिल दिलेनंतर संपूर्ण मालमत्ता कराची आगाऊ रक्कम भरणा करणा-या मालमत्ताधारकांना सामान्य करात सवलत देणेकामी महापालिका सभेकडे शिफारस करण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली.

 महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली,या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील,उल्हास जगताप तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 कासारवाडी मैला शुद्धीकरण केंद्रांतर्गत वार्षिक ठेकेदारी पद्धतीने दापोडी,फुगेवाडी,कासारवाडी परिसर व उर्वरित भागामध्ये ड्रेनेज लाईनची व चेंबर्सची देखभाल दुरुस्ती करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

 अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दत्तवाडी,विठ्ठलवाडी परिसरात तसेच कासारवाडी मैला शुद्धीकरण केंद्रांतर्गत प्रभाग २ व ६ मध्ये आणि पिंपळे सौदागर,विश्वशांती कॉलनी,काटेवस्ती,गावठाण परिसरात,पिंपळे निलख,विशालनगर,कस्पटेवस्ती,वेणूनगर,दत्त मंदीर,रहाटणी,रामनगर,शिवराजनगर येथील जलःनिसारण नलिका व मॅनहोल चेंबर्सची दुरूस्ती व देखभाल करणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

 चिंचवडेनगर,वाल्हेकरवाडी बिजलीनगर व इतर परिसरांमध्ये,किवळेविकासनगर,दत्तनगर,बापदेवनगर,आदर्शनगर व मामुर्डी येथील साईनगर,आदर्शनगर आझादनगर  परिसरामध्ये जुन्या जलनि:सारण नलिका बदलणे व  ड्रेनेज लाईन्स व चेंबर्सची दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

 कासारवाडी गेटाखालील रस्त्याची दुरुस्तीची कामे करणे कामी तसेच जलशुद्धीकरण सेक्टर २३ निगडी येतील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस उच्च दाब वीजभार वाढवणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

 प्रभाग क्रमांक २६ पिंपळे निलख येथील रक्षक चौक ते  पिंपळे निलख संरक्षण विभागाच्या हद्दीतील जाणाऱ्या १८ मीटर डीपी रस्त्यास सबवे करणेकामी येणा-या  खर्चास मान्यता देण्यात आली.

रावेत येथील हलविण्यात येणाऱ्या मुख्य जलवाहिनीस अडथळा  करणाऱ्या २२ के.व्ही. भूमिगत केबल बदलणेकामी, तसे मेट्रो प्रकल्पांतर्गत दापोडी ते पिंपरी मेट्रो पूलाखाली सुशोभित खांब व दिवे बसवणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय