बेघर, निराधार,वृद्ध महिला, मुले, वाट चुकलेल्या लोकांसाठी सावली निवारा केंद्र (pcmc)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी येथील सावली निवारा केंद्रातील बेघर, निराधार,वृद्ध महिला, मुले यांच्यासाठी वुई टुगेदर फाउंडेशन, पिंपरी चिंचवड या सेवाभावी संस्थेच्या वतीने नेहमी अन्नधान्य,कपडे आदी आवश्यक वस्तूंचे दान केले जाते. यावेळी CAFVD खडकी येथील प्रशासनिक अधिकारी लेफ्टनंट कर्नल उज्वल खातेवाडा यांनी या केंद्राचे संचालन करणाऱ्या रिअल लाईफ रिअल पीपल या संस्थेला डायफर्स, अन्नधान्य दान केले. (pcmc)
लेफ्टनंट कर्नल उज्वल खातेवाडा यांनी मागील वर्षी वुई टुगेदर फाउंडेशनच्या मावळ येथील दुर्गम भागातील आदिवासी मुलींना सायकल, औषधे वितरीत केली होती. पिंपरी येथे सावली निवारा केंद्राची माहिती आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत एक सेवा केंद्र काम करत आहे याबद्दल माहिती दिली होती. (pcmc)
सावली निवारा केंद्रातील मानवतावादी कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले ते म्हणाले की,
मोठ्या शहरांमध्ये विमनस्क अवस्थेत फुटपाथवर राहणाऱ्या बेघर, निराधार,वृद्ध महिला, मुले, निराधार लोकांना इथे आणून त्यांच्या आयुष्यात नवसंजीवनी दिली जाते, हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मानवतावादी अभियान आहे, या उपक्रमास मदत करताना आनंद होत आहे. रिअल लाईफ रिअल पीपल आणि वुई टुगेदर फाउंडेशनच्या टीमचे कौतुक लेफ्टनंट कर्नल उज्वल खातेवाडा यांनी केले.
संस्थेचे (WE TOGETHER FOUNDATION) सल्लागार मधुकर बच्चे यांनी सावली निवारा केंद्राची माहिती देताना सांगितले की, पिंपरी चिंचवड महापालिकेने दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत 10 ऑक्टोबर 2020 रोजी रस्त्याच्या लोकांसाठी सावली निवारा केंद्र सुरू केले. येथील स्वयंसेवक रस्त्यावर भटकणाऱ्या निराधारांना येथे आणून त्यांचे पुनर्वसन, सेवा करतात.
यावेळी खुशाल दुसाने म्हणाले की, रियल लाइफ रिअल पीपल या संस्थेच्या सावली निवारा केंद्राचा उद्देश निःस्वार्थ सेवा हा आहे, हे कठीण काम आहे.
यावेळी मेजर सुधीर सिंग, सलीम सय्यद, खुशाल दुसाने, जयंत कुलकर्णी, दिलीप चक्रे, सलीम सय्यद, उल्हास दाते, श्रीनिवास जोशी, मंगला सपकाळे – डोळे मॅडम, अरविंद पाटील आदी उपस्थित होते.
मनपाच्या नागरवस्ती विभागामार्फत शहरातील बेघर निराधार लोकांच्या या केंद्रात स्वतंत्र कॅन्टीन, महिला, पुरुष वॉर्ड आहेत. येथे 80 महिला पुरुष, लाभार्थी 28 महिला, 47 पुरुष, मुले 5 आहेत.
रिअल लाईफ रिअल पीपलचे एम ए हुसेन, गौतम थोरात, सचिन बोधनकर, अग्निस फ्रान्सिस, उमा भंडारी,लक्ष्मी वायकर, लक्ष्मी कांबळे, अमोल, भाट यावेळी उपस्थित होते. (pcmc)