Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : आमदार साहेब, चऱ्होली ते चिखली रस्त्यावर प्रवास करा दहा वर्षाच्या...

PCMC : आमदार साहेब, चऱ्होली ते चिखली रस्त्यावर प्रवास करा दहा वर्षाच्या कामाची उपरती होईल- अजित गव्हाणे

भोसरी विधानसभा मतदारसंघातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून आंदोलन (PCMC)

100 खड्ड्यांमध्ये 100 कमळाची फुले लावून अनोखे आंदोलन

रस्त्यांच्या दुरावस्थेवरून आमदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : चिखली- मोशी- चऱ्होली रेसिडेन्शिअल कॅरिडोर केल्याच्या बाता मारणाऱ्या भोसरीच्या आमदारांनी चऱ्होली, मोशी ते चिखली या रस्त्यांवर एकदा डोळे उघडे ठेवून प्रवास करावा. या रस्त्यावरील खड्डे पहावे. येथे होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारा मनस्ताप यांचा अनुभव घ्यावा म्हणजे आपण नक्की गेल्या दहा वर्षात काय केले याची
त्यांना उपरती होईल अशी जळजळीत टीका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे. (PCMC)

माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि.3) दाभाडे वस्ती, चऱ्होली येथे खड्ड्यांच्या प्रश्न संदर्भात आंदोलन करण्यात आले. यावे टीळी 100 खड्ड्यांमध्ये 100 कमळाची फुले लावून अनोखे आंदोलन करत खड्ड्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.

आंदोलनासाठी माजी नगरसेविका विनया तापकीर, नंदू तात्या शिंदे, सुनील गव्हाणे ,
मल्हारी गवळी, जयेश गव्हाणे, किशोर गव्हाणे, विनोद गव्हाणे, सागर गव्हाणे, विनायक रणसुभे, विनोद गव्हाणे, संतोष डफळ, चऱ्होलीचे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप तापकीर, दत्ता बुर्डे, प्रशांत तापकीर, सचीन तात्या तापकीर, वैशाली तापकीर, प्रतिभा तापकीर, सुरेखा तापकीर, अनिल तापकीर, संतोष वांदळे तापकीर, राजू बुरुळे, सागर अर्जुन तापकीर, अनिल सुदाम तापकीर , संतोष चंद्रकांत तापकीर, सागर प्रताप तापकीर, कुणाल किसन तापकीर, सुरज दाभाडे, शैलेश चंद्रकांत तापकीर, प्रवीण तापकीर, मुकुंद शेळके, दिनेश तापकीर, आदी उपस्थित होते. (PCMC)


दाभाडे वस्ती, चऱ्होली फाटा ते चऱ्होली गाव हा अत्यंत गजबजलेला, लोकवस्ती प्रचंड प्रमाणात वाढत असलेला भाग आहे. या भागातील रस्त्यांची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झाली आहे. चऱ्होली पुण्याशी कनेक्टिव्ह असल्याने वेळेची बचत होते म्हणून आपल्या शहरातून पुणे शहरात ये जा करताना बहुतांश वाहतूक खडीमशीन मार्गे चऱ्होलीतून मार्गक्रमण करते. असे असताना या रस्त्यांकडे अतिशय दुर्लक्ष झाले आहे. याचा फटका येथील नागरिकांना तर बसला आहेच. शिवाय ये जा करणाऱ्या नागरिकांनाही वेळ आणि पैसा या दोन्हींचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. खडीमशीन ते चऱ्होली गाव येईपर्यंत तासंनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. यामुळे नागरिक अक्षरशः वैतागले आहेत.

विनया तापकीर
माजी नगरसेवक
गेल्या दहा वर्षापासून आपण पाहतोय, ऐकतोय पण दिसत काहीच नाही अशी भोसरी विधानसभा मतदारसंघाची अवस्था झाली आहे. कोट्यावधी रुपये खर्चाचे आकडे दाखवले जातात. पण ठोस कामे दिसतच नाही. पैसे तर खर्च झालेत मग या भागाचा विकास अजूनही का रखडला आहे. चऱ्होली आज शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. लाखो लोक इथे वास्तव्याला आहेत. शहरातून बाहेर ये जा करण्यासाठी हा अतिशय चांगला मार्ग असताना येथील रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था आहे. प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहतूक मंदावते त्याचा परिणाम पुणे नाशिक महामार्गावर होत असल्याचे देखील दिसून आले आहे. याच गोष्टीचे लक्ष वेधण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

ब्रेकिंग : जुन्नर येथील इंगळून घाटात दरड कोसळली, या गावांचा संपर्क तुटला

मोठी बातमी : संसदेतील ‘त्या’ भाषणानंतर राहुल गांधींवर ईडीची छापेमारी होणार ?

Jio, Airtel चे टेन्शन वाढले ; TATA आणि BSNL मध्ये मोठा करार

ब्रेकिंग : माझी लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन माहिती समोर

मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास

भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

संबंधित लेख

लोकप्रिय