Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : निगडी पर्यंत मेट्रो विस्तारीकरण सुरू, शहरवासीयांची स्वप्नपूर्ती - महेश लांडगे

PCMC : निगडी पर्यंत मेट्रो विस्तारीकरण सुरू, शहरवासीयांची स्वप्नपूर्ती – महेश लांडगे

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी ते निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रोच्या कामाला सुरूवात झाली आहे. हा मार्ग 4.4 किमीचा असून पूर्णपणे उन्नत मार्ग आहे. यामुळे स्वारगेट ते पीसीएमसी कॉरिडॉर हा निगडीपर्यंत विस्तारित होणार आहे. गेल्या पावणे दोन वर्षांपासून महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. रेल्वे आणि मेट्रोसाठी सुद्धा राज्यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली आहे ज्याचा फायदा नागरिकांना होत आहे. PCMC metro

पिंपरी-चिंचवडकरांची स्वप्नपूर्ती

‘‘पुणे-पिंपरी-चिंचवड मेट्रोचे काम पिंपरीपर्यंत ज्या वेगात सुरू आहे. त्याच वेगात निगडीपर्यंत होईल..’’ असे आश्वासन राज्याचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

आज निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या कामाला सुरूवात झाली. ही पिंपरी-चिंचवडकरांची खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्ती आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची यानिमित्ताने आठवण झाली. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द खरा ठरला. पिंपरी-चिंचवड (pcmc) शहरातील सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. यासोबतच आगामी काळात हिंजवडी-वाकड-पिंपळे सौदागर- भोसरी-चाकण असा मेट्रो विस्तारासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. तमाम पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने राज्य व केंद्रातील महायुती सरकारचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो.

महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

आज दहावीचा निकाल, असा पहा निकाल !

12वी च्या पुरवणी परिक्षेसाठीचे अर्ज आजपासून भरता येणार!

हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी

दिल्ली बेबी केअर सेंटरला आग, 7 मुलांचा मृत्यू, अनेक जखमी

ब्रेकिंग : गुजरातमधील राजकोट मध्ये अग्नितांडव, 33 जणांचा होरपळून मृत्यू

इंडियन प्रीमियर लीग 2024 निमित्त गुगलचे खास डूडल पाहिलेत का ?

खूशखबर : सोने चांदीच्या भावात मोठी घसरण

मोठी बातमी : दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, धाकधूक वाढली

मोठी बातमी : जुन्नरचे बिबटे गुजरातला जाणार, वाचा काय आहे कारण !

उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन

Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क

पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक

ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी

मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती

संबंधित लेख

लोकप्रिय