Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : थाटामाटातील लग्नाची स्पर्धा कमी करावी - डॉ. देवरे

PCMC : थाटामाटातील लग्नाची स्पर्धा कमी करावी – डॉ. देवरे

खान्देशी मराठा समाजाचा वधू- वर पालक परिचय मेळावा

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : खान्देश मराठा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला खान्देशी मराठा समाज बांधवांचा वधू- वर पालक परिचय मेळावा निगडी प्राधिकरण येथे संपन्न झाला. pcmc news
प्रमुख पाहुणे धुळे जिल्हा रुग्णालयाचे माजी आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिक देवरे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष मधुकर पगार, उपाध्यक्ष गुलाब पाटील, उपाध्यक्ष सयाजी पाटील, सचिव प्रदीप शिंदे, खजिनदार भास्कर पाटील, कार्यकारणी सदस्य मिलिंद पाटील, संजय पाटील, सुरेश पाटील, कृष्णराव अहिरराव आणि मार्गदर्शक समिती सदस्य बी.के.पाटील, माधव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय माधव पवार यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ प्रतिक देवरे यांच्या हस्ते वधू वर सूची प्रकाशन केले.

यावेळी डॉ देवरे म्हणाले कि, मुलींना शिकविले पाहिजे व तिला तीच्या पायावर उभे केले पाहिजे. कारण पुण्यासारख्या शहरात दोघांना नोकरी करावी लागते. तरच चांगला संसार करू शकतात. मराठा समाजात लग्न थाटमाटात करण्याची लागलेली स्पर्धा ही सर्व सामान्य माणसाचे कंबरडे मोडणारी असून ती कमी झाली पाहिजे.

मंडळाचे अध्यक्ष यांनी अध्यक्षीय मनोगता मध्ये आपल्या समाजाने कमीत कमी लोकांमध्ये विवाह सोहळा पार पाडावा, असे आवाहन केले.

वधू वर यांचा परिचय पत्रक वाचन मिलिंद पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पाटील यांनी तर आभार एस आर पाटील यांनी मानले. pcmc news

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धनंजय पाटील, रवींद्र पाटील, ज्ञानेश्र्वर एंडाईत,ज्ञानेश्र्वर पाटील,चेतन ठाकरे, अशोक पाटील, राजेंद्र देसले,राखी पाटील,दिपाली पाटील, सुनीता पाटील यांनी विशेष सहकार्य केले. pcmc news

मंडळाचे सचिव प्रदीप शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

कार्यक्रमानंतर सर्वांनी सुरुची भोजनाचा मनसोक्त आस्वाद घेत आलेल्या पालकांशी एकमेकांशी चर्चा करण्यास पूरेशी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. pcmc news

संबंधित लेख

लोकप्रिय