Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC:महात्मा फुले मंडळातर्फे २१ महिलांचा गौरव, महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करावा- खासदार श्रीरंग...

PCMC:महात्मा फुले मंडळातर्फे २१ महिलांचा गौरव, महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करावा- खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: आपल्या देशातील राष्ट्रपुरुषांनी सर्व समाज उन्नतीसाठी महान कार्य केलेत. ते एका ठराविक जातीचे नव्हते.त्यामुळे त्यांना एका जातीच्या चौकटीत बसवणे योग्य नाही.या महापुरुषांचे आत्मचरित्र वाचून आत्मसात केले पाहिजेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या विचारांचा प्रसार केला पाहिजे. अशी अपेक्षा खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली.
चिंचवड येथील महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने उल्लेखनिय कार्य करणाऱ्या २१ महिलांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
हा पुरस्कार सोहळा चिंचवड येथील कै. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात संपन्न झाला.
यावेळी आमदार उमा खापरे, ज्येष्ठ नेते वसंत लोंढे, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष कविता आल्हाट, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे,सुरेश भोइर,माजी महापौर अपर्णा डोके,संगीता ताम्हाणे,अश्विनी चिंचवडे,चेतन भुजबळ,शेखर ओव्हाळ,उद्योजक संजय जगताप,प्रकाश जमदाडे,प्रशांत डोके, आण्णा गायकवाड, वंदना जाधव, आनंदराव कुदळे , राजेंद्र कर्पे, मोहन भुमकर, सीए सुहास गार्डी,डॉ धनंजय वर्णेकर,गणेश कळमकर, मंडळाचे अध्यक्ष हनुमंत माळी आदि मान्यवर उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेचे राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी १३ वर्षे न्यायालयीन लढा देऊन भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याचा मार्ग सुकर करणाऱ्या पुणे मनपाच्या विधी विभागाच्या प्रमुख अॅड. निशा चव्हाण, मनपा उपायुक्त प्रतिभा पाटील व श्वेता दारुणकर यांना यावर्षी क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरविण्यात आले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कारार्थी २०२४ अॅड. निशा चव्हाण (कायदा भूषण पुरस्कार), प्रतिभा पाटील(कर्तव्य भूषण),
मालन भुजबळ (आदर्श माता),
रंजना गायकवाड (आदर्श माता),
नाझिया जाकीर हुसेन मुलाणी (फातिमा सावित्री पुरस्कार),डॉ. अर्चना क्षिरसागर – (रखमाबाई राऊत सावित्री वैद्यकीय भूषण),
ज्योती तापकीर – (आदर्श मुख्याध्यापिका),
शुभांगी तरस (शिक्षण भूषण),अनिता दुधाळ / राऊत – (आदर्श शिक्षिका), अश्विनी तळेले (आदर्श शिक्षिका), शशिकला ओव्हाळ,ज्योती कळमकर, सोनम जांभूळकर,रुपाली आल्हाट,
सपना माळी,आदिती निकम,गौरी धुमाळ,
भारती पाटील ( सर्व समाज भूषण),
अश्विनी पवार (पत्रकार भूषण),सायली केदार काणे (कला भूषण),मोनिका तायडे (कला भूषण),वैशाली देशमाने (योग भूषण) तृप्ती रामाणे (उद्योगभूषण) यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी सत्यशोधक चित्रपट निर्माते आप्पा बोराटे दिग्दर्शक प्रवीण तायडे आणि सहकलाकारांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष हनुमंत माळी,सचिव विश्वास राऊत,कार्याध्यक्ष अनिल साळुंखे,खजिनदार सूर्यकांत ताम्हाणे, उपाध्यक्ष नरहरी शेवते ,राजेश कर्पे,प्रकाश जमदाडे, संजय जगताप,भरत आल्हाट,श्रीहरी हराळे,अमर ताजणे,वैजनाथ माळी,प्रदीप दर्शले,नवनाथ कुदळे, नितीन ताजणे,अनिता ताठे,उर्मिला भुजबळ, अलका ताम्हाणे,स्मिता माळी, कुंदा यादव,संगीता माळी, उर्मिला करपे आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय