Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांचा अण्णा बनसोडे यांना पाठिंबा

PCMC : कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांचा अण्णा बनसोडे यांना पाठिंबा

बाबा कांबळे यांनी घेतला उमेदवारी अर्ज माघारी (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बाबा कांबळे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सोमवारी (दि. 4) त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत आमदार बनसोडे यांना पाठिंबा जाहीर केला. आपण ज्या मागण्यांसाठी लढत आहोत त्या पूर्ण करण्याची ग्वाही महायुतीमधील नेत्यांनी दिल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले. (PCMC)

बाबा कांबळे म्हणाले, मी गेली 25 वर्षांपासून गोर गरिब कष्टकरी जनतेच्या प्रश्नांसाठी काम करत आहे. रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावे. यासाठी मागील अनेक वर्ष लढा देत आहे. सरकारने कल्याणकारी मंडळ स्थापन केले. परंतू त्याची अंमलबजावणी होत असल्याचे दिसत नाही. पिंपरी चिंचवडसह महाराष्ट्रभर कंत्राटी कामगार, कष्टकरी, साफसफाई कामगार, महिला पुरुषांना किमान वेतन, समान वेतन मिळत नाही. पीएफ मिळत नाही. यासाठी आम्ही अनेक वर्ष लढा देत आहोत.

बांधकाम कामगारांच्या प्रश्नावर देखील आम्ही मोठे काम केले असून त्याचा कायदा होण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. परंतु या कायद्याचा लाभ योग्यरित्या होत नसून यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये हॉकर्स झोन निर्माण झाले पाहिजे. आधुनिक पद्धतीने हॉकर्स झोन झाल्यास पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल व अनेकांना रोजगार मिळेल. फेरीवाले टपरी पथारी हातगाडी धारक फळभाजी विक्रेते खाद्यपदार्थांचे विक्रेते यांच्या प्रश्नांसाठी अनेक वर्ष पाठपुरावा केला आहे. यामध्ये बऱ्यापैकी यश आले आहे. यासाठी सक्षम कायदा झाला आहे. परंतु अजूनही यात अनेक त्रुटी असून कायद्यातील त्रुटी दूर करून याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हावी अशी आमची मागणी असल्याचे बाबा कांबळे म्हणाले. (PCMC)

बाबा कांबळे पुढे म्हणाले, गोरगरीब कष्टकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावे. त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, यासाठी आम्ही वेळोवेळी राजकीय भूमिका घेतली. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना विधानसभा व लोकसभेमध्ये जाहीर पाठिबा दिला. महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. कष्टकऱ्यांचे प्रतिनिधी विधानसभेत पाहिजेत, अशी भूमिका कष्टकरी जनतेची आहे. त्यांच्या आग्रहाखातर हा उमेदवारी अर्ज मी दाखल केला होता.

दरम्यान, आमच्या मागण्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा झाली. त्यांनी महायुतीचे सरकार आल्यानंतर आमच्या मागण्यांबाबत योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, भाजपचे शहराध्यक्ष बापू काटे, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, आरपीआय (आठवले) पक्षाचे बाळासाहेब भागवत, ज्ञानेश्वर कांबळे यांच्याशी चर्चा करून आपण अर्ज माघारी घेतला आहे. आम्ही महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा जाहीर करत आहोत.

पाठिंबा जाहीर करताना बाबा कांबळे यांच्यासोबत फेरीवाला समिती सदस्य आशा कांबळे, ममता मानुरकर, बळीराम काकडे, बाळासाहेब ढवळे, शुभम तांदळे, अनिल गाडे, अविनाश जोगदंड, लक्ष्मण शेलार, संतोष गुंड, सिद्धेश्वर सोनवणे, अनिल शिरसाट, काजल कांबळे, मधुरा डांगे, हिरामण गवारे, रवींद्र लंके, जाफर शेख, निखिल येवले, अजय साळवी, विनायक ढोबळे आदी उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर

मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते;राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल

रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश

दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत

मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

संबंधित लेख

लोकप्रिय