Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC:विविध स्पर्धांमध्ये जे. एस्. पी. एम. ब्लॉसम पब्लिक स्कूलचे घवघवित यश

PCMC:विविध स्पर्धांमध्ये जे. एस्. पी. एम. ब्लॉसम पब्लिक स्कूलचे घवघवित यश

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:बालाजी आर्टस्,कॉमर्स, सायन्स महाविद्यालय रावेत येथे शनिवार दिनांक ०६/०१/२३ रोजी आयोजित केलेल्या नृत्य व नाट्य स्पर्धेत ‘जे. एस. पी. एम. ब्लॉसम पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पुर्ननिर्माण संकल्पनेवर आधारित ‘पर्यावरण रक्षा ‘ पथनाट्यला प्रथम क्रमांक पारितोषिक व रोख रक्कम ८०००/- देण्यात आले,यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, पाहुण्या म्हणून भारती विद्यापीठ कला विभाग प्रमुख देविका बोरठाकूर उपस्थित होत्या.तसेच भारती विद्यापीठ इंग्लिश मिडियम स्कूल बालेवाडी, पुणे येथे ‘ डॉ.पतंगराव कदम – आदर्श व्यक्तिमत्व ‘ विषयावर आयोजित विश्वभारती वत्कृत्व स्पर्धा २०२४ मध्ये ब्लॉसम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये अनुश्री लोखंडे इयत्ता पाचवी हिला सुवर्ण पदक व रिया शर्मा इयत्ता नववी हिला रजत पदक मिळाले.यावेळी भारती विद्यापीठ इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका भावना रॉय व प्रमुख पाहुणे म्हणून यश भालेराव व संजय टाक उपस्थित होते.


शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय स्वाती आरू तसेच उपप्राचार्या दीपा पवार यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे विशेष कौतुक केले.
‘जे. एस. पी. एम. ब्लॉसम पब्लिक स्कूल ताथवडे’ येथील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत मिळविलेल्या या यशाबद्दल विद्याथ्यांचे व शिक्षकांचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय