पिंपरी चिंचवड/क्रांतीकुमार कडुलकर:पालिकेच्या ड प्रभागाच्या आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मशाल मार्च रँलीचे आयोजन करण्यात आले होते.पिंपळे गुरव येथे तुळजाभवानी मंदिर ते राजमाता जिजाऊ उद्यान पर्यंत मशाल मार्चचे आयोजन करण्यात आले.
यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड म्हणाले कि,
महिला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासने व धाडसाने कार्यरत आहेत. खुरपणीपासून ते नासापर्यंत आणि राष्ट्रपती पदापर्यंत महिला कार्यरत आहेत.कोणत्याही क्षेत्रात महिला मागे राहीलेल्या नाहीत.
यावेळी राजमाता जिजाऊ उद्यान च्या समोरच पथनाट्य सादर केले.कु.अर्वी कांबळे या मुलीने मर्दानी खेळ सादर केले.
यावेळी सडक सुरक्षा सप्ताह व पर्यावरणाची
आण्णा जोगदंड व जयश्री आरणे यांनी शपथ देऊन मशाल रँलीची सांगता करण्यात आली.बेसिक टिमचे सिटी इनचार्ज रामेश्वर महाजन यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक, वाय.बी.फल्ले,मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड,मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रती च्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड,मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व वृक्षमित्र अरूण पवार,माजी नगरसेवक महेश जगताप, राजू लोखंडे,सागर अघोळकर चंदा लोखंडे,उषा मुढे,सुरेश सकट,राजू ओव्हाळ,मुकादम,सिद्धार्थ जगताप अशोक सोनटक्के बेसिक सिटी इनचार्ज-रामेश्वर महाजन,वॉर्ड इनचार्ज स्वराज कांबळे,निकेश सरवदे,समाधान कांबळे,मारुती कांबळे,दीपक चौर राहुल जाधव,राहुल चव्हाण,ऋतुजा पेडणेकर,डॉ भूषण पेडणेकर,पल्लवी भाटे,आदी मान्यवर मिरवणुकीत सामील झाले होते.