Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : एकात्मिक बाल विकास सेवा योजना लोक कल्याणकारी उपक्रम -...

PCMC : एकात्मिक बाल विकास सेवा योजना लोक कल्याणकारी उपक्रम – सुरेश टेळे

अंगणवाडी पर्यवेक्षिका अपर्णा कुलकर्णी  यांच्या सेवानिवृत्ती  समारंभात प्रतिपादन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : केंद्र व राज्य सरकारच्या एकात्मिक  व  बाल विकास सेवा विभागाच्या पिंपरी चिंचवड प्रकल्पातील  सुपरवायझर अपर्णा कुलकर्णी यांचा सेवा निवृत्ती  सोहोळा काशीधाम,मंगल कार्यालय, चिंचवड येथे ( दि.२३ मार्च) आयोजित करण्यात आला होता. PCMC NEWS

यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील अंगणवाडी सेविका, मदतनीस,वरिष्ठ अधिकारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे महिला व  बाल विकास विभागाचे बालविकास प्रकल्प,पिंपरी चिंचवड पुर्व चे प्रकल्प अधिकारी सुरेश टेळे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते  अपर्णा कुलकर्णी यांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 

आपण समाजाचे सेवेकरी आहोत – सुरेश टेळे

या वेळी प्रमुख अतिथी, पिंपरी चिंचवड,पूर्व विभागाचे बालविकास प्रकल्प अधिकारी सुरेश टेळे यांनी विभागाची माहिती देताना सांगितले की,
—- लोक कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेतून ग्रामीण, आदिवासी व शहरी झोपडपट्टी भागातील शालेयपूर्व बालकांची योग्य  देखभाल साधण्यासाठी सुदृढ माता, बालके व कुपोषण मुक्त भारतासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) हा उपक्रम ऑक्टोंबर १९७५ पासून भारत सरकारने सुरू केला आहे. या उपक्रमात नोकरी करणारे आपण सर्व कर्मचारी हे समाजाचे सेवेकरी आहेत.असे प्रतिपादन सुरेश टेळे यांनी केले. PCMC NEWS

अपर्णा कुलकर्णी यांनी २२ वर्षे सेवा देऊन अंगणवाड्यांची सुपरवायझर म्हणून जबाबदारीने काम केले आहे, त्यांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे कार्यक्षम टीम वर्क करताना कौटुंबिक नाते निर्माण केले. बालके, गर्भवती महिला व स्तनदा माता यांच्या पोषण,लसीकरण,सर्वेक्षण ई. गरजा भागविण्यासाठी व त्यांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी सरकारचा कुपोषण मुक्त भारत उपक्रमात त्यांनी सेवाभावी वृत्तीने  सेवेकरी म्हणून काम केले आहे. त्यांना शुभेच्छा देताना खूप आनंद होत आहे, अशा भावना सुरेश टेळे यांनी त्यांचा सत्कार करताना व्यक्त केल्या.


या निवृत्ती शुभेच्छा सोहोळ्यास सुरेश टेळे, वंदना मोरे, पद्मजा जाधव ( निवृत्त मुख्य सेविका), अर्चना राईज (मुख्य सेविका मॅडम), प्रशांत राऊत (वरिष्ठ लिपिक) आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पिंपरी चिंचवड (PCMC) विभागातील मालती पानसकर, सुरेखा दाभाडे, मोहिनी नाटे, सुरेखा दाभाडे  या अंगणवाडी सेविकांच्या स्वागत गीताने समारंभाची सुरवात झाली.

वंदना मोरे, लता कस्तुरे, सविता होलमुखे, ज्योती लोधे, उषा ढेकणे, आरती मोरे, छाया जाधव, शैलजा चौधरी,शंकर कुलकर्णी, माधवी कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.

उपस्थित अंगणवाडी सेविकांनी अपर्णा कुलकर्णी यांचे औक्षण करून साडी चोळी व भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचालन अंगणवाडी सेविका धनश्री थिटे यांनी केले.

कार्यक्रमाचे संयोजन रत्नप्रभा विभुते, आरती मोरे, शंकर कुलकर्णी यांनी केले.सर्वांना स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय