पिंपरी चिंचवड : सलग चार दिवस मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीला महापूर आला, मात्र या महपुरामुळे मोशी कुरूळी हद्दीतील नदीपात्रात असलेली जलपर्णी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जुन्या पुलावरून (दि.२५ जुलै) जलपर्णी वाहून गेली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका जलपर्णी काढण्यासाठी ठेके देते, मात्र पावसाळा सुरू होईपर्यंत जलपर्णी मुक्त इंद्रायणी होत नाही. (PCMC)
गेल्या सात आठ महिन्यापासून मोशी चिंबळी हद्दीत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या केटी बंधारा येथील येथे मोठ्या प्रमाणात असलेली जलपर्णी इंद्रायणीच्या महापुरात वाहून गेली, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, आणि या पावसाच्या पाण्यामुळे ठेकेदाराचे मोठे काम सोपे झाले, अशा कॉमेंट्स नेटकरी करत आहेत. (PCMC)