पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ ,नागपूर या सामाजिक संस्थेच्या पुणे टीम चे नुकतेच पदे नियुक्ती कार्यक्रम चिखली येथील या संस्थेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांच्या संपर्क कार्यालयात दि. १६ जुन रोजी पार पडली. pcmc
पुणे जिल्हा टीम मधील नव निर्वाचित सदस्यांना पदे नियुक्ती पत्रक वाटप करून सर्वांचे स्वागत करण्यात आले.
सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांवरील होणाऱ्या अन्याया विरुद्ध लढण्यासाठी संस्थेचे नवीन पदे जाहीर करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात, तर समाजातील होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बळ देण्याचे काम ही संस्था गेले पाच वर्षे करत आहे. pcmc
संस्थेच्या माध्यमातून विविध घटकांना मदत करण्याचे आवाहन सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार आणि पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांनी केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांच्या हस्ते नाव निर्वाचित सदस्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.या प्रसंगी ‘पैसे नको, रद्दी द्या’ या सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमाचे नियोजन करण्यात आले तर एक सामाजिक बांधिलकी म्हणुन ‘एक झाड भविष्यासाठी’ हा वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यासाठी विविध चर्चा करण्यात आल्या. pcmc
पुणे टीम मध्ये नवनिर्वाचित पुणे जिल्हा अध्यक्ष अमित कोकणे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष महेंद्र शेळके आणि राजेंद्र नंदरगी, खेड तालुका अध्यक्ष अमोल नेपते, मुळशी तालुका अध्यक्ष नामदेव चौगले, पुणे जिल्हा उपाध्यक्ष भगवान वायकर, सदस्य आदिनाथ शिंदे, सलमान शहा यांची नियुक्ती करण्यात आली. pcmc
सदर प्रसंगी संस्थेचे पुढील उद्दिष्टे आणि संस्थेचे कार्य वाढविण्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड आलेल्या सदस्यांना संस्थेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांनी केले. सामाजिक कार्यात अग्रेसर सेवाभावी संस्थांशी सहयोग करून संस्थेची एक उत्कृष्ठ टीम कार्यरत राहणार आहे, असे त्यांनी सांगितले. pcmc
सामाजिक क्षेत्रात येत असलेले अनेक मुद्दे त्यांनी सांगितले जिथे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ सारख्या संस्थांची अत्यंत गरज आहे.
सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार आणि पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांनी अभिनंदन केले.
हेही वाचा :
धक्कादायक : पुरलेल्या बाळाचा मृतदेह गायब, सोलापुरातील मोदी स्मशानभूमीतील घटना
ब्रेकिंग : EVM हॅक झाल्याच्या चर्चांवर निवडणूक आयोगाने दिली महत्वाची माहिती
ब्रेकिंग : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत 140 पदांसाठी भरती
ब्रेकिंग : 400 पार झालो असतो तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं भाजप नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी : EVM मशीन AI द्वारे हॅक होऊ शकते इलॉन मस्क यांच्या दाव्याने खळबळ
ब्रेकिंग : महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, भाजपची डोकेदुखी वाढली
PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
ब्रेकिंग : भारतीय तटरक्षक दलात 320 पदांची मोठी भरती