Saturday, May 18, 2024
Homeताज्या बातम्याPCMC : उद्यमशीलता, उत्कृष्टता हा एक प्रवास - हर्षवर्धन पाटील

PCMC : उद्यमशीलता, उत्कृष्टता हा एक प्रवास – हर्षवर्धन पाटील

‘दखल उद्यमशीलतेची, कौतुक उत्कृष्टतेचं पीबीएस कॉर्पोरेट एक्सलन्स -२०२४’ पुरस्कारांचे वितरण

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : प्रत्येक यशस्वी संघटनेच्या अथवा संस्थेच्या यशामागे कर्तृत्ववान व्यक्तींचा विशेष सहभाग असतो. अशा व्यक्तींची दूरदृष्टी, नेतृत्व आणि अथक मेहनत संस्थांना उत्कृष्टतेकडे घेऊन जातात. उत्कृष्टता ही एकदम मिळत नसते तर तो एक प्रवास असतो. त्यासाठी संपूर्ण समर्पण, चिकाटी आणि अपेक्षेपेक्षा जास्त करून दाखवण्याची प्रतिबद्धता यांचा समावेश असतो, असे प्रतिपादन नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील यांनी केले. हर्षवर्धन पाटील व उद्योजक नरेंद्र लांडगे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.


पीसीईटीच्या पुणे बिझनेस स्कुलने नुकताच ‘पी. बी. एस. कॉर्पोरेट एक्सलन्स -२०२४’ पुरस्कार वितरण हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हिंजेवाडी, पुणे येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता.


पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या (पीसीयु) प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी, पीबीएसचे संचालक डॉ. गणेश राव, अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी त्यागी आदी उपस्थित होते.


‘पी.बी.एस. कॉर्पोरेट एक्सलन्स – २०२४’ पुरस्कारला उदंड आणि उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण देशातून पाचशे पेक्षा अधिक प्रवेशिका आल्या होत्या. नामांकन समितीत नामवंत कंपन्यांचे अध्यक्ष, संचालक आणि अधिकारी यांचा समावेश होता.


विविध विभागांसाठी पुरस्कार –
यामध्ये मोस्ट इन्स्पायरिंग मॅनेजिंग डायरेक्टर, मोस्ट सक्सेसफुल सीईओ, बेस्ट सीओओ, बेस्ट सीएचआरओ ,एचआर लीडर, यंग एचआर टॅलेंट, डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन आयकॉन यांचा समावेश होता. यावेळी दिव्यांग व्यक्तींना अन संग हिरोज हा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
डॉ. मणीमाला पुरी यांनी पीसीईटी शैक्षणिक समुहातील शिक्षण संस्था, पिंपरी चिंचवड विद्यापीठाने केलेल्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. डॉ. मीनाक्षी त्यागी यांनी स्वागत केले. डॉ. गणेश राव यांनी आभार मानले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय