Sunday, May 5, 2024
Homeताज्या बातम्याVIRAL VIDEO : मुंबईच्या ट्रेनमध्ये मुलीने केला अश्लिल डान्स

VIRAL VIDEO : मुंबईच्या ट्रेनमध्ये मुलीने केला अश्लिल डान्स

मुंबई : रील बनवण्याच्या प्रक्रियेत लोक वेळ, ठिकाण आणि परिस्थितीकडे दुर्लक्ष करतात. दिल्ली मेट्रोपासून मुंबई लोकल ट्रेनपर्यंत लोकांच्या डान्सचे व्हिडिओ आणि काही खासगी क्षण व्हायरल होत असतात.
सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुणाईला सार्वजनिक ठिकाणी व्हिडिओ बनवायचे वेड सामाजिक नितीमूल्यांना पायदळी तुडवणारे आहेत, दिल्लीच्या मेट्रो मध्ये डान्स करणे,एकमेकाला किसींग करण्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

पोलिसांनी याबाबत सार्वजनिक सभ्यतेच्या कायद्यानुसार संबंधितांना शोधून कडक कारवाया पण केल्या आहेत.


मुंबईच्या लोकल मध्ये अश्लील डान्स करण्याऱ्या अशाच एका मुलीचा मुंबई पोलीस शोध घेत आहेत.दरम्यान, मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना एका मुलीचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे (Dance Viral Video). व्हिडिओमध्ये ती मुलगी एका भोजपुरी गाण्यावर डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे.रेल्वेकडून या प्रकरणाची दखल घेऊन रेल्वे पोलीस या व्हिडिओची चौकशी करत आहेत.

मुलीच्या डान्समुळे डब्यात बसलेल्या प्रवाशांना खूपच अस्वस्थ वाटत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. या डान्स व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. विशेष म्हणजे रेल्वेच्या एक्स हँडलने या प्रकरणाची दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाने मध्य रेल्वे सुरक्षा विभागाला दिले आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय