Monday, July 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : डॉक्टरांनी स्वतःचे आरोग्यदेखील सांभाळावे

PCMC : डॉक्टरांनी स्वतःचे आरोग्यदेखील सांभाळावे

आयएमएकडून डॉक्टरांचा गौरव pcmc

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या पिंपरी- चिंचवड-भोसरी शाखेच्या वतीने विविध उपक्रमांनी आंतरराष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त आकुर्डीत डॉक्टरांना सन्मानित करण्यात आले. PCMC

यावेळी आयर्न मॅन शर्यतीतील विजेते डॉ. सलील पाटील, डॉ. सुरेश पेठे, गिर्यारोहक डॉ. शुभांगी टेकूरकर, डॉ. अनिरुद्ध टोणगावकर, छायाचित्रकार डॉ. विनित कोल्हे, डॉ. निखिल बुरुटे, जल-रंग चित्रकार डॉ. माया भालेराव, अभिनेते डॉ संजीव पाटील अशा विविध विषयावर चर्चासत्राचे आयोजित करण्यात आले होते.

यावेळी डॉक्टर पेशा व्यतिरिक्त काही छंद जोपासल्यास शारिरीक अणि मानसिक फिटनेस राहण्यास मदत होते व इतरांना प्रेरणा मिळावी हा या मागचा हेतु होता. तसेच डॉक्टरांनी सामाजाचे आरोग्य जपताना स्वतःच्या आरोग्यावर देखील लक्ष दिले पाहिजेत.असा सूर चर्चा सत्रात सहभागी डॉक्टरांनी काढला.

आयएमएतर्फे राबवलेले विविध उपक्रम तसेच पर्यावरण दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष डॉ. माया भालेराव, सचिव डॉ.सारिका लोणकर, खजिनदार डॅा. मनीषा डोईफोडे यांनी भूषविले.

कार्यक्रम आयएमएचे विश्वस्त डॉ. संजय देवधर, डॉ. संजीव दात्ये, डॉ. सुहास माटे, डॉ. मोहन स्वामीनाथन,डॉ. विजय सातव, डॉ. मनीषा पाटील, डॉ. सुमीत लाड, डॉ. सुशील मुथियान, डॉ. ज्योती डेकाटे, डॉ. ललित धोका, डॉ. शैलजा माने, डॉ. गीता करंबळेकर, डॉ. प्रभाकर बुरुटे, डॉ. रुपाली चौधरी, डॉ. रितू लोखंडे मोठ्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी डॅा. सुधीर भालेराव, डॅा.अमृता इंगळे, डॅा. निहार इंगळे यांनी पार पाडली.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर

धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अमली पदार्थांचे प्रकरण विधानपरिषदेत

ब्रेकिंग : वैद्यकीय अधिकारी संवर्गाच्या पदभरतीसाठी महत्वाची बातमी

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय