पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – शिवतेज नगर, चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने महानगरपालिकेचे आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांना साडी व मिठाई वाटप करण्यात आले. सदर वाटप हे म. न. पा. आरोग्य विभागाचे ब्रँड अँबेसिडर यशवंत कन्हेरे यांचे हस्ते करण्यात आले. (PCMC)
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हरि नारायण शेळके, राजू गुणवंत, जितेंद्र छाबडा, भजनी मंडळाचे अध्यक्ष मनीषा देव शोभा नलगे इ. इत्यादी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी केले. (PCMC)
प्रास्ताविकात ते म्हणाले गेली तेरा वर्ष प्रतिष्ठानच्या वतीने या भागामधील सफाई कर्मचाऱ्यांना मिठाईवाटप करीत असतो. यावर्षी महिलांना साड्या व पुरुष कर्मचाऱ्यांना ड्रेस घेऊन मिठाईवाटप करण्यात आली. नागरिकांचा आरोग्य चांगलं राहावं म्हणून स्वतःचा आरोग्य धोक्यात घालून दैनंदिन साफसफाई चे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील गोड व्हावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
याप्रसंगी यशवंत कन्हेरे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केले. हे सफाई कर्मचारी नसून स्वच्छता दूत आहे. असे त्यांना संबोधले त्यांच्यामुळे शहर अतिशय स्वच्छ आणि सुंदर राहते त्यामुळे बेस्ट अवॉर्ड देखील आपल्याला मिळालेला आहे.
हेही वाचा :
छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण
धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन जाहीर
नताशा स्टँकोविक हिचा हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा
शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून अश्लील व्हिडीओ शूट
गुन्हेगारी संपवू ,बेरोजगारी संपवू, विकासाचे सर्व प्रश्न हाताळू – रोहित पवार
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य
धक्कादायक : सांगलीत कुऱ्हाडीने वार करून भाजप नेत्याची निर्घृण हत्या
अकोल्यातील सभेत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; गरिबांना पक्के घर देणार
महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा
फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर