पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर, (दि.२४) : विजयादशमी व श्री साईबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त पुणे – आळंदी रोड, वडमुख वाडी येथील श्री साई मंदिरामध्ये गुरुवार पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी बारा वाजता झालेल्या माध्यान्ह आरतीनंतर श्रींच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोमवार पासून सुरू झालेल्या या महोत्सवाची सांगता गुरुवारी संध्याकाळी ७ वा. धुपारती, ७:३० ला निमंत्रित कलाकारांच्या कार्यक्रम, रात्री १० वा. पालखी प्रदक्षिणा नंतर श्रींची शेजारती होऊन उत्सवाची सांगता होईल.
विजयादशमीच्या दिवशी पहाटे पाच वाजता श्रीं ची काकड आरती, सनईवादन, मंगल स्नान, पारायण सांगता सोहळा, रुद्राभिषेक, भिक्षा झोळी, भजन कार्यक्रम यानंतर दुपारी १२ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत माध्यान्ह आरती झाली. आरती नंतर महाप्रसाद, श्रीं चे नामस्मरण, श्रीं ची प्रार्थना व दीपज्योत, नंतर ४:३० वाजता सिमोल्लंघन व मिरवणूक, श्रीं ची पालखी, धुपारती, निमंत्रित कलाकारांचा कार्यक्रम व श्री हरिजागर रात्री दहा वाजता असे धार्मिक कार्यक्रम झाले अशी माहिती श्री साईबाबा मंदिर, वडमुखवाडी, आळंदी रोड पुणेचे विश्वस्त, अध्यक्ष सुभाष नेलगे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.