Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा मतदान शपथ घेऊन १०० टक्के मतदानाचा निर्धार

PCMC : अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा मतदान शपथ घेऊन १०० टक्के मतदानाचा निर्धार

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपमार्फत मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.

त्याचाच भाग म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत (Maval loksabha 2024) पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी विद्यार्थ्यांनी आम्ही आगामी लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदान करण्यासाठी वंश, जात, समुदाय भाषा व इतर कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता, आम्ही निर्भीडपणे मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ घेतली.

निगडी,सेक्टर २६ येथील पिंपरी चिंचवड (pcmc) अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी (दि. ५ एप्रिल) घेतली, तसेच शंभर टक्के मतदानाचा निर्धारही केला. या कार्यक्रमास मतदार नोंदणी अधिकारी विनोद जळक, पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास आणि कल्याण विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रविण काळे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी.प्रा. दिनेश कुटे,नोडल अधिकारी विजय भोजने, मुकेश कोळप, प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. PCMC NEWS

यावेळी मतदार नोंदणी अधिकारी विनोद जळक यांनी मार्गदर्शन करताना प्रत्येकाने मतदान करून मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन केले.

तर काॅलेजचे अधिष्ठाता डाॅ.काळे यांनी दरवर्षी सरासरी ४ हजारांहून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेत असल्याचे सांगून १३ मे रोजी होणा-या लोकसभा निवडणुकीसाठी काॅलेजमध्येही आजी-माजी विद्यार्थांमार्फत सोशल मिडीयाद्वारे जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगून उपस्थित प्राध्यापक, सेवक वर्ग आणि विद्यार्थ्यांना १०० टक्के मतदान करावे असे आवाहन केले यावेळी विद्याथ्यानीही १०० टक्के मतदान करण्याचा तसेच मित्र परिवार व इतर ठिकाणी (social media) सोशल मिडीयाद्वारे मतदानाचा प्रचार करणेबाबत तयारी दर्शविली.

संबंधित लेख

लोकप्रिय