Friday, November 15, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC Video: चिखली कुदळवाडी मोई रस्ता पहिल्या पावसात रस्त्याची चाळण,धोकादायक खड्डे तातडीने...

PCMC Video: चिखली कुदळवाडी मोई रस्ता पहिल्या पावसात रस्त्याची चाळण,धोकादायक खड्डे तातडीने बुजवा

आयुक्तांनी पाहणी करून रस्ते दुरुस्त करावेत, रोहन चव्हाण यांची मागणी

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : दि.25 –
पहिल्या पावसातच कुदळवाडी मोई फाटा चिखली या रहदारीच्या रस्त्याची व कुदळवाडी चिखली प्राधिकरण पेठ क्र.१६ या अंतर्गत रस्त्याची चाळण होऊन जीवघेणे खड्डे पडून पाणी तुंबले आहे. मनपाच्या ‘फ’ प्रभागातील स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागील आर्थिक वर्षात येथील अंतर्गत रस्त्याचे खडीकरण, काँक्रीटीकरण आणि संपूर्ण देखभाल दुरुस्ती केलेले नाही. त्यामुळे येथे असुरक्षित धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.



कुदळवाडी ते मोई फाटा व चिखली प्राधिकरण ते चिखली या सर्वात जास्त रहदारीच्या आणि गजबजलेल्या रस्त्याची पूर्णतः चाळण झालेली आहे. या रस्त्यावर पेट्रोल पंप, पोलिस चौकी, किराणा दुकाने, हाऊसिंग सोसायट्या, बँक एटीएम, स्क्रॅप कलेक्शन दुकाने, वर्कशॉप, वजन काटा, हॉटेल्स आहेत. या रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यामुळे दुचाकी घसरल्या आहेत. येथील दुरवस्था पाहता इथे जीवघेणे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.



चिखली कुदळवाडीतील या अतिशय गजबजलेल्या रस्त्याची दुरवस्था होऊन संपूर्ण रस्ते अपघात प्रवण झालेले आहेत. मा.आयुक्त साहेबांनी या रस्त्यांची विशेष पाहणी करून रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी, नागरिक व व्यावसायिक, माता भगिनी, विद्यार्थी यांना संभाव्य अपघाता पासून वाचवावे, अशी मागणी चिखली येथील युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते रोहन चव्हाण यांनी केली आहे. आज त्यांनी स्वतःहून या रस्त्याची पाहणी केली आहे.

विधवा महिलांना तुच्छतेची वागणूक नको, त्यांनाही मानाचा दर्जा मिळाला पाहिजे – सीता केंद्रे

विशेष लेख : जीन्स पँटची निर्मिती कशी झाली व त्यामुळे कोणते तोटे झाले ?

PCMC : जागरूक नागरिकांनी 82 दिवसात मनपाच्या तिजोरीत 300 कोटी जमा केले

संबंधित लेख

लोकप्रिय