Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : सनदी लेखापालांचा लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदानाचा निर्धार

PCMC : सनदी लेखापालांचा लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदानाचा निर्धार

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा-दीपक सिंगला

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि. ३ : पिंपरी चिंचवड शहरातील सनदी लेखापाल, नवोदीत मतदार आणि नागरिकांनी १३ मे रोजी होणाऱ्या मावळ लोकसभा निवडणुकीत मतदान करून जगातील सर्वात मोठ्या लोकशाही उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांनी केले.

निगडी येथील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या पिंपरी चिंचवड (PCMC) शाखेत आयोजित मतदान जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, मतदान नोंदणी अधिकारी विनोद जळक, तहसीलदार जयराज देशमुख, समन्वयक अधिकारी विजय भोजने, मुकेश कोळप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आयसीएआय संस्थेचे अध्यक्ष पंकज पाटणी, उपाध्यक्ष वैभव मोदी यांच्यासह प्रक्षिक्षणार्थी सनदी लेखापाल उपस्थित होते. PCMC NEWS

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या (Loksabha election 2024) अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमाद्वारे मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात सहभाग घेवून सर्व सनदी लेखापाल, प्रशिक्षणार्थी यांनी  स्वत: मतदान करण्यासोबत इतरांनाही प्रोत्साहीत करावे, असे आवाहन श्री.सिंगला यांनी केले. संस्थेतील यंदा प्रथमच मतदान करणाऱ्‍या नवोदीत मतदारांचे त्यांनी अभिनंदन केले. PCMC NEWS

मतदान हा प्रत्येक भारतीयाचा मूलभूत हक्क असून सर्व सनदी लेखापाल (CA) तसेच प्रशिक्षण घेत असलेल्या नवोदित विद्यार्थ्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन पाटणी यांनी केले. यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील प्रशिक्षणार्थी सनदी लेखापालांनी निवडणूकीत मतदान करण्याची शपथ घेतली.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!

बापरे! कोरोना नंतर चीनमधून “ही “नवीन समस्या जगात विध्वंस पसरवणार

भरघोस उत्पादन देणारी अशी करा उन्हाळी भुईमूग लागवड

ब्रेकिंग: शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर!

कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

DME : वैद्यकीय शिक्षण संचालनालय अंतर्गत 233 जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय