Thursday, May 9, 2024
Homeआंतरराष्ट्रीयBreaking : तैवानमध्ये भीषण भूकंप,रेल्वे वीजपुरवठा ठप्प, 9 मृत्यू 900 जखमी

Breaking : तैवानमध्ये भीषण भूकंप,रेल्वे वीजपुरवठा ठप्प, 9 मृत्यू 900 जखमी

तैपेई : तैवानमध्ये शक्तिशाली भूकंप (Earthquake) झाला आहे. बुधवार, 3 एप्रिल रोजी राजधानी तैपेईमध्ये 7.2 रिश्टर स्केलच्या या भूकंपामुळे शेकडो इमारतींचे नुकसान झाले आहे.

द वॉशिंग्टन पोस्ट च्या वृत्तानुसार 963 लोक जखमी झाले आहेत, भूकंपामुळे शहरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. दक्षिण जपान आणि फिलिपाइन्ससाठी त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. (Taiwan news)

राजधानी तैपेईसह अनेक शहरांमध्ये इमारती कोसळल्या आहेत. तैवानसोबतच जपान आणि फिलिपाइन्समध्येही सुनामीचा (tsunami) इशारा देण्यात आला आहे. या भूकंपाचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाले आहेत, मागील  25 वर्षातील हा सर्वात मोठा भूकंप आहे, तैवानमध्ये सध्या इंटरनेट सेवा बंद झाली आहे.(Taiwan earthquake)

सीएनएनच्या रिपोर्टनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू हुआलियन शहराच्या दक्षिणेला सुमारे 18 किलोमीटर अंतरावर होता. तैवानच्या सेंट्रल वेदर ॲडमिनिस्ट्रेशननेही भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा दिलाय. CWA ने रहिवाशांना त्सुनामीचा इशारा पाठवला आहे. उत्तरेकडील किनारपट्टी भागात त्सुनामी येऊ शकते, असे सांगण्यात आले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!

बापरे! कोरोना नंतर चीनमधून “ही “नवीन समस्या जगात विध्वंस पसरवणार

भरघोस उत्पादन देणारी अशी करा उन्हाळी भुईमूग लागवड

ब्रेकिंग: शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर!

कॉम्रेड राजन क्षीरसागर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

DME : वैद्यकीय शिक्षण संचालनालय अंतर्गत 233 जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय