Thursday, November 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : अजित पवार यांना अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखालील शहर समितीचा पाठिंबा

PCMC : अजित पवार यांना अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखालील शहर समितीचा पाठिंबा

पिंपरी-चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीची बैठक 4 जुलै रोजी राष्ट्रवादीच्या पिंपरी येथील कार्यालयात झाली. यावेळी अजित पवार यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेण्यात आला आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, अजितदादांनी 1991 पासून पिंपरी-चिंचवडचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास झाला. यापुढील काळातही आणखी शहराचा परिपूर्ण विकास होण्यासाठी प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अजित दादांच्या नेतृत्वाची गरज आहे. शरद पवारसाहेब आमचे दैवत आहेत. परंतु, आम्ही शहरातील सर्व नेते, पदाधिकारी माजी नगरसेवक, दादांसोबत आहोत.असे अजित गव्हाणे यांनी सांगितले.



पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात अजित पवार हे सर्वमान्य नेतृत्व आहे. 1991 ते 2016 या संपूर्ण कालखंडात या औद्योगिक शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अजित पवार यांनी विशेष लक्ष देऊन विविध प्रकल्प मार्गी लावले आहेत. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांनी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून कार्यकर्त्यांची कामे मार्गी लावली आहेत. प्रशासनावर जबरदस्त पकड ठेवून अजित पवार यांनी नोकरशाहीला कार्यक्षम ठेवले आहे.असे अजित गव्हाणे यांनी सांगितले.


पिंपरी चिंचवडमधून अजित पवार यांच्या बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्ष नेते श्याम लांडे, राहुल भोसले, माजी नगरसेवक संजय वाबळे, मोरेश्वर भोंडवे, समीर मासुळकर, राष्ट्रवादी युवकचे विशाल वाकडकर, यश साने, प्रदिप तापकीर, श्याम जगताप, फजल शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विजय लोखंडे, सतीश दरेकर, नारायण बहिरवाडे, सचिन औटे, प्रकाश सोमवंशी, संजय औसरमल, इकलास सय्यद, शीतल हगवने, गंगा धेंडे, सुशील मंचरकर, अक्षय माछरे, शाम जगताप, शिवाजी पाडूळे, प्रदीप तापकीर, तुषार ताम्हाणे, शेखर काटे, प्रमोद साळवे, संजय उदावंत, प्रसाद कोलते, आदी 500 हुन आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले.

लोणावळा व्हिडिओ : भुशी डॅम ओव्हरफ्लो – चला पर्यटन करू


कोट्यावधी रुपये खर्च करूनही पवना इंद्रायणीला जलपर्णीचा विळखा


महाराष्ट्र : वैफल्यग्रस्त मोदी सरकारने केली लोकशाहीची निर्घृण हत्या

संबंधित लेख

लोकप्रिय