Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : अरुण पवार व बालाजी पवार यांच्यातर्फे भैरवनाथ मंदिराच्या मखर चांदीकामासाठी...

PCMC : अरुण पवार व बालाजी पवार यांच्यातर्फे भैरवनाथ मंदिराच्या मखर चांदीकामासाठी एक्कावन्न हजाराचा धनादेश

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : मराठवाडा जनविकास संघातर्फे कै.शकुंतला श्रीपती पवार यांच्या स्मरणार्थ वृक्षमित्र अरुण पवार व सरपंच बालाजी पवार यांच्या वतीने पिंपळे गुरव येथील श्री भैरवनाथ मंदिराच्या मखराच्या चांदीकामासाठी एक्कावन्न हजाराचा धनादेश मंदिर समितीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप, पिंपळे गुरव भजनी मंडळाचे अध्यक्ष जयराम देवकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. PCMC : A check of fifty one thousand by Arun Pawar and Balaji Pawar for Makhar Chandikam of Bhairavanath Temple

PCMC : A check of fifty one thousand by Arun Pawar and Balaji Pawar for Makhar Chandikam of Bhairavanath Temple

शिक्षक दिनाचे औचित्य साधून १०१ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षक व शिक्षिका यांनी त्यांना आलेले नाविन्यपूर्ण अनुभव सांगितले. तसेच शिक्षकदिनाचे महत्त्व सांगितले. यावेळी बोलताना अरुण पवार हे म्हणाले, की येणाऱ्या काळामध्ये शिक्षकांच्या ज्या काही समस्या, प्रश्न असतील ते मार्गी कसे लावता येतील यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहे.

मुख्याध्यापिका माधुरी लवटे यांनी त्यांच्या सर्व शिक्षकवृंदांच्या वतीने विचार व्यक्त करीत अरुण पवार यांचे आभार मानले. 

यावेळी ह.भ.प. संजय पाटील महाराज, ह.भ.प. लक्ष्मण महाराज पाटील, ह.भ.प. बब्रूवाहन वाघ महाराज, ह. भ. प. विक्रम महाराज जाधव, ह.भ.प. संजय महाराज हिवराळे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, महाराष्ट्र कामगार पुरस्कार प्राप्त बाळासाहेब साळुंखे सरपंच बालाजी पवार, माजी स्वी. नगरसेवक शिवाजी पाडुळे, सूर्यकांत कुरुलकर, किशोर पिंगळेकर, प्रकाश इंगोले, बालाजी पांचाळ, अनिता पांचाळ, दत्तात्रय धोंडगे, मुख्याध्यापिका माधुरी लवटे, मुख्याध्यापिका भारती वरने, शिक्षिका संगीता गिरी, वंदना वाघ, मालन गायकवाड, संजीवनी राऊत, मंजुश्री भालचिम, रजनी पळसे, सुनीता काडे, सोनाली सुडके, धनश्री चौगुले, संगीता आव्हाड, मनीषा दरेकर, मंगल शेळकंदे, मुक्ता असवले, शोभा माने, स्नेहा कांबळे, सुनीता बामणे, रूपाली शिंदे, सत्यभामा मुळूक, इंदू लांगी, अंजना बारवे, शिक्षक संतोष वाघमारे, मल्हारराव शेळके, नामदेव भालचिम, हिरामण खामकर, महिपती पाटील, मारुती आवरगंड, बळीराम माळी, सौदागर मांगलकर, तानाजी काटे, प्रल्हाद झरांडे, मुकेश पवार, तसेच भीष्माचार्य जेष्ठ नागरिक संघ, संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक संघ व भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय