Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यपतंजलीच्या कोरोनावरील औषधामुळे बाबा रामदेव यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल

पतंजलीच्या कोरोनावरील औषधामुळे बाबा रामदेव यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल

(जयपूर):- गेल्या आठवड्यात बाबा रामदेव यांनी पत्रकार परिषद घेत कोरोना विषाणूवर ‘कोरोनील’ व ‘स्वसारी’ या औषधे लॉन्च करत कोरोनावर गुणकारी असल्याचा दावा केला होता. मात्र त्यावेळी आयुष्य मंत्रालयाने याची गंभीर दखल घेत नोटीस पाठवली होती. त्यानंतर बाबा रामदेव यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पतंजलीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

      कोरोना विषाणूवर ‘कोरोनील’ व ‘स्वसारी’ ही औषध गुणकारी असून या औषधाला मान्यता मिळाल्याचेही बाबा रामदेव यांच्याकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर आयुष मंत्रालयाकडून या औषधांची जाहिरात थांबवत तपासणीला सामोरे जायला सांगितले होते. औषधाच्या निर्मितीसाठी उत्तराखंड सरकारने दिलेल्या परवान्याची प्रतही तपासणीसाठी मंत्रालयाने मागितली आहे.

     यानंतर बाबा रामदेव पतंजलीचे एमडी आचार्य बालकृष्ण, शास्त्रज्ञ अनुराग, एनआयएमएसचे चेअरमन बलबीर सिंह तोमर आणि संचालक अनुराग तोमर यांच्याविरोधात कोरोनिल औषधावरून जयपूरमध्ये पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   आयुष मंत्रालयाच्या नोटीस नंतर आचार्य बाळकृष्ण यांनी ट्विट केले होते की, “पतंजलीने कोरोनासाठी क्लिनिकल कंट्रोल ट्रायल पूर्ण करण्या अगोदर कोरोनिल औषधांना लिगली कोरोनाचे औषध कधी नाही म्हंटले”.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय