Friday, November 22, 2024
Homeराज्यPalghar : वाढवण बंदर उभारणीस केंद्र शासनाची मंजुरी

Palghar : वाढवण बंदर उभारणीस केंद्र शासनाची मंजुरी

76 हजार कोटींचा प्रकल्प; 10 लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण होणार PALGHAR

मुंबई : राज्यातील वाढवण (जि. पालघर) बंदर उभारणी करण्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्याच्या विकासासाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब असून यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे राज्याचे बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी आभार मानले आहेत. PALGHAR

जगातील 10 मोठ्या बंदरापैकी देशातील वाढवण हे एकमेव मोठे बंदर असणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. त्यातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार आहेत. सुमारे 12 लाख रोजगार निर्मिती होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त मंत्री श्री. बनसोडे यांनी व्यक्त केली.

वाढवण परिसरामध्ये राहणाऱ्या स्थानिक लोकांना, मत्स्यव्यवसाय करणारे व या व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांचे पुनर्वसन तसेच योग्य तो मोबदला देण्यात येणार आहे.

या व्यतिरिक्त कौशल्य विकास कार्यक्रम राबवून रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार आहे. वाढवण बंदरामुळे (vadhavan port) राज्याचा तसेच स्थानिक नागरिकांच्या आर्थिक विकासाचे नवीन दालन खुले होणार असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले. PALGHAR

वाढवण बंदर हे जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जे.एन.पी.टी.) व महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या संयुक्त भागिदारीतून होणार आहे. या बंदर प्रकल्पाची किंमत 76 हजार 200 कोटी रुपये आहे. यामध्ये केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा अनुक्रमे 74 व 26 टक्के आहे. वाढवण बंदराची उभारणी करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !

NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती

MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

आंतरराष्ट्रीय योग दिवस : प्राचीन ज्ञानाचा आधुनिक जगाला वारसा

BSF : सीमा सुरक्षा दलात 10वी/12वी उत्तीर्णांसाठी भरती; पगार 81000 पर्यंत

AVNL : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

मोठी बातमी : वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या कारवर चप्पल फेक ?

मोठी बातमी : हज यात्रेत 550 जणांचा उष्मघाताने मृत्यू !

मोठी बातमी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचे वितरण

ब्रेकिंग : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

संबंधित लेख

लोकप्रिय