Thursday, November 21, 2024
HomeNewsपुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा !

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा !


पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही मुस्लीम तरुणांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थातच पीएफआयच्या सुमारे ४१ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे.

या घडामोडी घडत असताना मुस्लीम नुमाइंदा काउन्सिलने या वादात उडी घेतली आहे. पीएफआयच्या कार्यकर्त्यांना तातडीने सोडा, अन्यथा लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरू, अशा इशारा मुस्लीम नुमाइंदा काउन्सिलचे माजी अध्यक्ष झियाउद्दीन सिद्दिकी यांनी दिला आहे. ते औरंगाबादेत पत्रकारांशी बोलत होते.

मुस्लीम नुमाइंदा काउन्सिलचे माजी अध्यक्ष झियाउद्दीन सिद्दिकी यावेळी म्हणाले की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी करोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता औरंगाबादेत विविध जातीधर्मांच्या लोकांची मदत केली. कोविड मृतावर अंत्यसंस्कार केले. केवळ सरकारविरोधात भूमिका घेतल्याने त्यांना अटक केली जात आहे. हे खोटे गुन्हे रद्द करुन त्यांची निर्दोष मुक्तता करावी. अशी दडपशाही सहन केली जाणार नाही. आम्ही शांत आहोत, याचा गैरफायदा घेऊ नका. अन्यथा लोकशाही मार्गानि रस्त्यावर उतरू, असा इशारा मुस्लीम नुमाइंदा काउन्सिलचे माजी अध्यक्ष झियाउद्दीन सिद्दिकी यांनी दिला.

संबंधित लेख

लोकप्रिय