जुन्नर : 23 डिसेंबर 2021 रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या रोटरी युथ लीडरशिप अवॉर्ड कार्यक्रमांतर्गत आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह जुन्नर येथे ‘हम होंगे कामयाब’ या विषयावर चेतन शहा व ‘भविष्याला सामोरे जाताना जाताना’ या विषयावर डॉ. अमोल पुंडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना रोटरीचे समन्वयक धनंजय राजूरकर म्हणाले, रोटरी ही जगातील सर्वात मोठी एनजीओ आहे. या संस्थेचे आरोग्य व शिक्षण यावर काम चालते याविषयी माहिती दिली रुरल युथ लीडरशिप अवॉर्ड अंतर्गत तरुणांपर्यंत प्रेरणादायी विचार पोचवून त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे कार्यशाळा घेतल्या जातात.
डॉ. अमोल पुंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ग्रामीण भागातून शिक्षण घेताना जाणवणारा न्यूनगंड आणि त्यावर केलेली मात याविषयी आपल्या संवादातून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. आपल्यातल्या जमेच्या बाजू काटक शरीर कष्टाची तयारी तुम्ही आयुष्याला सामोरे जा. पोपटराव पवार, श्रीमती राहीबाई पोपेरे तसेच कविता राऊत यांनी मिळालेली संधी सार्थक करून दाखवलं हे महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी आता आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे. शिक्षण घेणे ही सर्वात मोठी संधी आहे, काय करायच आहे याच्या वरती लक्ष द्या. आपले ध्येय निश्चित असेल तर समाजही सपोर्ट साठी मदतीसाठी आपल्या सोबत असतो. तसेच स्वतः व आपल्या घरातल्या स्त्रियांचे आरोग्याची काळजी घ्या. आहार नीट घ्यावा, याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी रोटरीचे अध्यक्ष हितेंद्र गांधी, आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह जुन्नर च्या गृहपाल अर्चना पवार आदीसह मोठ्या संख्येने विद्यार्थीनी उपस्थित होत्या.