गोंदिया : विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत आहे,गोंदिया आणि नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरात सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. धुक्यामुळं व्हिजीबीलीटी कमी असल्यानं मुख्य रस्त्यावर वाहने सावकाश धावत आहेत.
कमाल तापमान 14.4 अंश सेल्सिअसवर गेलंय. पण, गारठा वाढलाय. उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे विदर्भातील कडाका अजून वाढण्याची शक्यता आहे. गोंदिया हा तांदूळ उत्पादक जिल्हा आहे. येथील रब्बी हंगामासाठी डिसेंबर, जानेवारी महिन्यातील गारठा उपयुक्त असतो.
– क्रांतिकुमार कडुलकर