Saturday, October 5, 2024
Homeजिल्हाकडाक्याची गुलाबी थंडी आणि दाट धुक्याने कराड शहर झाकोळले

कडाक्याची गुलाबी थंडी आणि दाट धुक्याने कराड शहर झाकोळले

कराड ( सातारा ) : कृष्णा – कोयनेचा प्रीतिसंगम, कराडचा कृष्णा घाट आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांचा समाधी परिसर बुधवारी धुक्यात हरवला. संपूर्ण परिसरावर दाट धुक्याची चादर पहायला मिळाली.पहाटेचे तापमान 19 डिग्री मुळे कडाक्याच्या थंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत. या आल्हाददायक वातावरणात नदीपात्रावरून पक्ष्यांचे थवे देखील विहार करताना पहायला मिळाले.

पुणे – बंगलोर महामार्ग कोल्हापूर नाका, शनिवार पेठ, सोमवारपेठ सह मुख्य बाजारपेठेत पहाटे 4 वाजल्यापासून धुक्याची चादर संपूर्ण शहरभर पसरली होती. कृष्णा – कोयनेच्या प्रीतीसंगम घाटावर मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नागरिकांनी थंडीचा कडाका अनुभवला.

– क्रांतिकुमार कडुलकर


संबंधित लेख

लोकप्रिय