पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: राजस्थान रणजी क्रिकेट टीम चे माजी कर्णधार आणि ज्येष्ठ क्रिकेटर कैलाश गट्टानी यांच्या सन्मानार्थ लायन्स क्लब ऑफ तळवडे प्राइड यांनी ५० वर्षावरील पुरुषांसाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे.
स्पर्धा दिनांक ०२.०१.२०२४ ते ०४.०१.२०२४ दरम्यान हजारे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मोशी येथे संपन्न होणार आहे.या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र रणजी खेळाडू निवड समितीचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांच्या हस्ते व लायन चे प्रांत प्रमुख यांच्या उपस्थितीत सकाळी 8.30 होईल. दिनांक 4 जानेवारी रोजी नवीन उदयोन्मुख खेळाडू चा सत्कार करण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेमध्ये पुणे,पिंपरी चिंचवड,पनवेल आणि नागपूर येथील खेळाडू सहभागी झालेले आहे.
सदर स्पर्धेत मालिकावीर,उत्कृष्ट फलंदाज,उत्कृष्ट गोलंदाज,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक,उत्कृष्ट फील्डर, फायटर ऑफ मॅच आणि प्रत्येक सामन्याचा सामनावीर अशी पारितोषिके दिली जाणार आहेत.
या स्पर्धेत चार संघ सामील होणार असून चारही संघाना त्यांच्या स्पर्धेतील रंकिंग प्रमाणे ट्रॉफी देण्यात येणार आहे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात उत्तम आरोग्य ही एक देणगी आहे आणि उत्तम आरोग्य असण्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहार अत्यंत गरजेचा आहे. वयाचे बंधन न बाळगता ५० वर्षावरील हे सर्व खेळाडू पुढील तीन दिवस स्पर्धात्मक क्रिकेटचा आनंद घेणार आहेत.
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी लायन्स क्लूब तळवडे प्राइड मधील सर्व संभासदांनी अध्यक्ष कैलाश पारिख , विजय अगरवाल, वसंत कोंकणे आणि क्रीडा संचालक शिरीष भोपे यांनी पुढाकार घेतला आहे.