Friday, November 22, 2024
Homeजुन्नरजुन्नर : गोळेगाव शाळेत अन्नकोट स्पर्धेचे आयोजन

जुन्नर : गोळेगाव शाळेत अन्नकोट स्पर्धेचे आयोजन

जुन्नर / आनंद कांबळे : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव येथे विद्यार्थी व पालकांसाठी अन्नकोट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आपण सेवन करीत असलेल्या पदार्थांमधून आपल्याला सर्व प्रकारचे अन्नघटक मिळावेत याबाबत जाणीव जागृती करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सूर्यकांत माळी यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व पालकांचे व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. Organized Annakot Competition in Golegaon School under Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana

मुख्याध्यापक मोहन नाडेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून समतोल आहाराचे महत्त्व उपस्थित विद्यार्थी व पालकांना समजावून सांगितले. या अन्नकोट स्पर्धेत विद्यार्थ्यांनी व पालकांनी मेदुवडा, डोसा, उत्तप्पा, सांबर चटणी, आवळ्याचा मुरंबा, शिरा चिक्की, ढोकळा, वरई-भात रव्याचे आप्पे, कडधान्याचे थालीपीठ, उपवासाचा मेदुवडा, दामटीचे लाडू, कोबीच्या वड्या, आंबट गोप्या, रव्याचा केक, धान्यापासून निघालेल्या कोंड्याच्या वड्या, मोदकाची भाजी, पराठे, शेंगदाणा लाडू, इडली, पुरणपोळी अशा विविध प्रकारचे पदार्थ या अन्नकोट स्पर्धेसाठी आणले होते.

अन्नकोट स्पर्धेसाठी आणलेल्या सर्व पदार्थांचे परीक्षण गौरी सरजिने व साधना लोखंडे यांनी करून प्रथम पाच पदार्थांची निवड केली. त्यांना शाळेच्या वतीने स्टीलचे ताट, ग्लास, फुलपात्र अशा वस्तू बक्षीस म्हणून देण्यात आल्या.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : 

1. प्रथम क्रमांक : सिद्धांत गडदे – धान्याच्या कोंड्याची वडी

2. द्वितीय क्रमांक : दुर्गेश कांडले – कडधान्याचे थालीपीठ

3. तृतीय क्रमांक : वैष्णवी माळी – दामटीचे लाडू

4. चतुर्थ क्रमांक : त्रिशा ताम्हाणे – मेदुवडा

5. पाचवा क्रमांक : प्रज्ञा ताम्हणे – आवळ्याचा मुरंबा

सदर कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सूर्यकांत माळी, मुकुंद लगड, भागुबाई ताम्हाणे, ज्योती ताम्हाणे, सुनीता गडदे, संध्या गडदे, संदीप ताम्हाणे, अंकुश ताम्हाणे, स्वाती ताम्हाणे, सुमन ववऱ्हाडी, सुलोचना माळी, कर्मा कणसे आदी महिला व पालक उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश शिंदे यांनी केले तर नियोजन दत्तात्रेय उगले, किरण पवार यांनी केले मारुती साबळे यांनी आभार मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय