Saturday, April 27, 2024
HomeNewsआळंदीत प्रजासत्ताक दिना निमित्त तिरंगा रॅली, अजानवृक्ष पूजा, स्वच्छता विविध उपक्रमांचे...

आळंदीत प्रजासत्ताक दिना निमित्त तिरंगा रॅली, अजानवृक्ष पूजा, स्वच्छता विविध उपक्रमांचे आयोजन उत्साहात

आळंदी/अर्जुन मेदनकर : येथील तीर्थक्षेत्र आळंदीत भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त आळंदी पंचक्रोशीत सामाजिक बांधिलकीतून काम करणा-या विविध सेवाभावी संस्थाच्या वतीने तसेच आळंदी पोलीस, आळंदी नगरपरिषद, दिघी आळंदी वाहतूक पोलीस यांचे सहकार्याने तिरंगा रॅलीचे देशभक्तीमय उत्साहात आयोजन करण्यात आले.

या रॅली चा प्रारंभ वारकरी शिक्षण संस्था संचलित जोग महाराज मंदिर चौकातून आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) रमेश पाटील यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, सह्यादी इंटरनॅशनल स्कुलचे अध्यक्ष गणेश गरुड, ज्ञानदीप इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष वैजिनाथ ठवरे, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे आदी उपस्थित होते. रॅली चे संयोजन आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, नेचर फाउंडेशन अध्यक्ष भागवत काटकर, यशवंत संघर्ष सेना महा. राज्य अध्यक्ष विष्णू कुऱ्हाडे, पोलीस मित्र युवा महासंघ, महा. राज्य प्रदेश अध्यक्ष प्रवीण बोबडे, पोलीस वेल्फेअर फाऊंडेशन ऑफ इंडिया अध्यक्ष शिवाजी जाधव एल्गार सेना आळंदी शहर अध्यक्ष बाळासाहेब कवळासे, शिवा संघटना, महा. राज्य आळंदी शहर अध्यक्ष सदाशिव साखरे, दक्षता सेवा फाऊंडेशन आळंदी शहर अध्यक्ष किरण नरके, श्री सिद्धबेट विकास प्रतिष्ठान विकास मुंगसे, जगदंबा इलेकट्रीकल उद्योजक दिलीप कुलकर्णी, योगेश महाराज वाघ आदी सेवा भावी संस्थाचे वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

देशभक्तीमय वातावरणात तिरंगा रॅली वारकरी शिक्षण संस्थे पासून सुरु होऊन चाकण चौक प्रदक्षिणा रस्ता मार्गे वडगाव चौक, मरकळ चौक, जलाराम मंदिरा समोरून दत्त मंदिर, पोलीस चौकी, चावडी चौक, मराठी शाळा क्रमांक २ पासून श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर मार्गे आळंदी नगरपरिषद चौक मार्गे जुन्या दगडी पुलावरून देहू फाटा येथून यु टर्न घेऊन वाय जंक्शन मार्गे चाकण चौक मार्गे गोपाळपूर येथून समारोपास आळंदी सिद्धबेट येथे पोहोचली. येथील सिद्धबेट मध्ये प्लास्टिक संकलन स्वच्छता अभियान नंतर भारत माता कि जय, वंदे मातरम अशा विविध घोषणा देत सांगतेसाठी आली. आळंदी सिद्धबेट येथील पंचवटी उद्यान मध्ये उत्साहात आली. येथील संत लीलाभूमी आळंदी सिध्दबेटात अजानवृक्ष पूजन, वारकरी साधक शालेय मुलांना अजिंक्य डी.वाय.पाटील कॉलेजच्या वतीने अन्नदान वाटप करण्यात आले. तिरंगा रॅली ची सांगता सिध्दबेटात स्वच्छता अभियान राबवून उत्साहात करण्यात आली. या ठिकाणी संकलित करण्यात आलेला कचरा आणि प्लास्टहीक आळंदी नगरपरिषदेकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी उदय काळे, मनोहर दिवाने, उद्योजक रायबाशेठ तापकीर, माऊली दास महाराज, अनंत पुणेकर, मनोज हिवरकर, विश्वास सोनटक्के, बंडूनाना काळे, शशिकांतराजे जाधव, आनंत कलशेट्टी, उद्योजक दिलीप कुलकर्णी, बाळासाहेब मुंगसे, लहुजी आमराळे, किरण कोल्हे, प्रकाश बनकर, सोमनाथ साखरे, नानासाहेब मोरे, सिद्धेश्वर सलगर बाबासाहेब भंडारी आदी उपस्थित होते. यावेळी ज्योती पाटील, योगिता काटकर, वैशाली जाधव आदी महिला पदाधिकारी यांचे हस्ते सिध्दबेटात अजानवृक्ष पूजन करण्यात आले. श्रींचे पूजे नंतर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी उपस्थितांना अन्नदान वाटप करण्यात आले. रॅली दरम्यान आळंदी पोलिसांनी सुरळीत वाहतुकीचे नियोजन केले. आळंदीतील स्वच्छ सर्व्हेक्षण, स्वच्छ, सुंदर आणि हरित आळंदीचे जनजागृतीसाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

ग्यानज्योत इंग्लिश मिडीयम मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

मुक्तादेवी शिक्षण प्रसारक मंडळ, पद्मावती देवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ग्यानज्योत इंग्लिश स्कूल मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजाचे ध्वजारोहण आळंदीचे माजी उपनगराध्यक्ष वासुदेव घुंडरे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य सादर करीत विविध कवायती सादर करीत लक्षवेधी मनोरे यांच्या प्रात्याक्षिक सादर केले. शाळेच्या विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर लेझिम सादर करून उपस्थितांची माने जिंकली. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र घुंडरे, संचालिका कीर्ती घुंडरे,आळंदी जनहिताचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, दत्ता डफळ, पोलीस मित्र युवा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण बोबडे, ज्योती पाटील त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सर्व शिक्षकांनी केले. सुत्रसंचलन अर्चना नाईकवाडे यांनी केले. आभार कल्पना खैरनार यांनी मानले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय