Thursday, April 18, 2024
HomeNewsबाबुराव दादा बेलदार पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

बाबुराव दादा बेलदार पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

तांदूळवाडी ता. बारामती (क्रांतिवीर रत्नदीप):
तांदुळवाडी येथील बाबुराव दादा बेलदार पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲड. बळवंत बेलदार पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व ध्वजगीत गाऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

बाबुराव दादा बेलदार पाटील स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते उत्तेजनार्थ बक्षीसे देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही सांस्कृतिक कार्यक्रमास उत्कृष्ट प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी ॲड. बळवंत बेलदार पाटील, मंगेश एजगर, स्कूलच्या प्राचार्या सोलनकर मॅडमसह इतर शिक्षकवृंद ,पालकवर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय