Tuesday, May 21, 2024
Homeजिल्हामहापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र कष्टकरी पंचायतीच्या वतीने मेणबत्ती लावून रॅली काढून बाबासाहेबांना अभिवादन...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र कष्टकरी पंचायतीच्या वतीने मेणबत्ती लावून रॅली काढून बाबासाहेबांना अभिवादन !

बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपावा – बाबा कांबळे

शिका संघटित व्हा संघर्ष करा हे बाबासाहेबांचे विचार आत्मसात करण्याची गरज – राहुल डंबाळे

पिंपरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाचा अखंड महासागर आहेत. त्यांनी दिलेले विचार प्रत्येकाने जोपासणे गरजेचे आहे. देशातील सर्वच समाजातील नागरिकांच्या हक्काची जपणूक त्यांनी संविधानामार्फत केली. त्यांच्या विचारांचे आपण वारस होऊन तो विचार आयुष्यात जपणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन, महाराष्ट्र कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी येथे सफाई कामगार महिला पुरुष व  कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने मेणबत्ती लावून अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बाबा कांबळे बोलत होते. सफाई कामगार महिला, कष्टकरी यांच्या वतीने मेणबत्ती लावून अभिवादन करण्यात आले. 

या वेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, बळीराम काकडे, घरकाम काम महिला सभा अध्यक्षा आशा कांबळे, सफाई कामगार महिला संघटनेच्या नेत्या मधुरा डांगे,रुख्मिन कांबळे, सानी कांबळे, आदीसह कष्टकरी महिला व पदाधिकारी उपस्थित होते.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षण घेऊन देशाची मान उंचावली, अर्थातच गोरगरीब कष्टकरी जनतेने हे विचार आत्मसात करत आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले पाहिजे कष्टकऱ्यांच्या मुलं डॉक्टर आयएस वकील मोठे अधिकारी झाले पाहिजे शिका संघटित व्हा संघर्ष करा हे बाबासाहेबांचे विचार अंगिकारण्याचे आवाहन केले राहुल डंबाळे यांनी केले.

संविधानाच्या प्रास्ताविक प्रतीचे वाचन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय