Saturday, November 16, 2024
Homeजुन्नर22 ऑगस्ट ला वंचितचा 'जन आक्रोश मोर्चा' 

22 ऑगस्ट ला वंचितचा ‘जन आक्रोश मोर्चा’ 

जुन्नर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गायरान, शासकीय, महसूल जमिनीवरील अतिक्रमणधारकांचा जन आक्रोश मोर्चा दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी वंचित चे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर तहसीलदार कार्यालयावर काढण्यात येणार आहे. (Jan Aakrosh Morcha)

मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होईल त्यानंतर पुढे जुन्नर बस स्टँड – कृषी उत्पन्न बाजार समिती – तहसिल कार्यालय (धान्य बाजार) असा मार्ग असेल, असेही सांगण्यात आले आहे.

यावेळी गायरान, शासकीय, महसूल जमिनीवरील अतिक्रमणे कायम करण्याची मागणी करण्यात येणार असून मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन वंचितच्या वतीने करण्यात आले आहे.

या मोर्चाचे आयोजन वंचितचे जुन्नर तालुका अध्यक्ष गणेश वाव्हळ, महासचिव सागर जगताप, उपाध्यक्ष आरिफ मोमीन, उपाध्यक्ष एकनाथ भंडलकर, सचिव राहुल धोत्रे, संघटक शरद पंडित व तालुका समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

बँक नोट मुद्रणालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी!

बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत 499 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज 

BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती; ऑनलाईन करा अर्ज! 

ICAR : नागपूर येथे NBSSLUP अंतर्गत लिपिक, सहाय्यक पदांची भरती

धुळे येथे मनरेगा अंतर्गत 100 पदांची भरती; 8वी, 10वी उत्तीर्णांना संधी! 

कृषी सहसंचालक कोल्हापूर विभागात 250 रिक्त पदांची भरती 

Jan Aakrosh Morcha
Jan Aakrosh Morcha
संबंधित लेख

लोकप्रिय